Type to search

Breaking News क्रीडा ब्लॉग मुख्य बातम्या

विश्वचषक २०१९ : मॅच हरलो एवढंच ना….

Share

हो ठीक आहे आपण मॅच हरलो एवढंच ना….

सर्वात पहिले कर्णधार कोहली आणि टीम इंडियाचं विशेष अभिनंदन…. भारतीय क्रिकेट इतिहासातील एक चांगल्या टीमपैकी तुमची एक टीम आहे. खर म्हणजेच मुळात हा संघ समतोल होता. विराट कोहलीने खूप चांगलं नेतृत्व करून भारतीय संघाला सेमीफायनल पर्यंत पोहचवले. शिवाय सामना झाल्यानंतर टीम न्यूझीलंडचे कौतुक करत झालेल्या चुका मान्य केल्या. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेत सर्वच खेळाडूंच योगदान हे विराट कोहलीने नमूद केले . खेळाडू वृत्ती काय असते हे एका खेळाडूला चांगले माहिती असते.

सामना झाला असा कि मँचेस्टर च्या नैसर्गिक वातावरणानुसार खेळपट्टीवर बॉल स्विंग होत होते. यामुळेच दोन्ही संघाच्या गोलंदाजांच कौतुक आहेच. बुमराह, कुमार, पंड्या, जडेजा, चहल, बोल्ट, हेन्री, फर्गुसन,निषम, सैंटेनर सर्वांनी भेदक मारा केला. खेळपट्टीवर बॉल चांगला ग्रीप करत होता. याचा फायदा भारतीय गोलंदाजांनी घेत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर भेदक मारा करत त्यांना २४० च्या आत थांबवलं. भारतीय चाहत्यांसाठी हा सर्वात सुखद क्षण होता.

नंतर दुसऱ्या दिवशी देखील तोच प्रकार पाहायला मिळाला. न्यूझीलंडच्या गोलंदाजाचे शार्प आऊटस्विंग, इनस्विंग भारतीय खेळाडूंना पेलता आले नाही परिणामी सामना गमवावा लागला. विश्वचषकातील गुणतक्त्यात प्रथम क्रमांकावर असणारी टीम सेमीफायनलला बाहेर जाते. एकूणच सर्व सामने बघता भारतीय संघ विश्वचषक जिंकणार असं प्रत्येक भारतीयाला वाटत होत. पण तसं आता होणार नाही हे दुःख आहेच.

भारतीय क्रिकेट प्रेमींनी हे लक्षात घेतले पाहिजे कि भारतीय संघानं केलेली कामगिरी इतरांच्या तुलनेत आजच्या सामन्यापूर्वी सर्वोत्तम होती. जडेजा-धोनी या विश्वचषकातील ७ व्या विकेट साठीची विश्वविक्रमी भागीदारीने सामन्यात जान आणली होती. जडेजाने शॉर्ट बॉलवर खेळलेला चुकीचा फटका आणि धोनी चा रनआउट हा सामन्यातील टर्निंग पॉंईट ठरला आणि आपण सामना गमावला नव्हे तर विश्वचषक गमावला. एवढी समतोल टीम असताना आपण हरलो याच भारतीय चाहत्यांना दुःख नक्कीच होतंय पण आपण पूर्ण स्पर्धेत खूपच चांगला खेळ केला हे मान्य देखील करावे लागेल.

खरं तर आपणही यावर विचार करायला हवं. धोनी बाद झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील भाव सर्व काही सांगून जात होते. सामना हरल्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा चे डोळे पाणावलेले दिसतात. हिटमॅनची गोल्डन बॅट मिस झाली. संपूर्ण देश त्या आंदोत्सवाची वाट पहात होता. पण हा अपघात जिव्हारी लागणारा नक्कीच आहे. यावेळी भारतीयांनी भारतीय संघासोबत असले पाहिजे. क्रिकेट प्रेमी म्हणून टीम जिंकली तरी आणि हरली तरी टीम इंडिया सोबत राहील आहे. म्हणूनच एका पराभवाने काहीही होत नाही. आपण हरलो एवढंच ना…. आणि एक कायम लक्षात ठेवा इतिहास कधीच मरत नसतो तो चुकीच्या आकलनातून प्रेरक न बनता बाधक होतो.

-प्रफुल्ल रेखा एकनाथ वाघ, नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!