Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

भाजपा, शिवसेनेचे महापौर,उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल

Share

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या सोळाव्या महापौर व उपमहापौर या पदासाठी अर्ज प्रक्रिया होत असून दुपारी दोन वाजेपर्यंत २१ इतके अर्ज दाखल झाले आहे.

दरम्यान महापौरपदासाठी भाजपकडून महापौर पदासाठी ०६ अर्ज तर उपमहापौर पदासाठी ०४ अर्ज दाखल करण्यात आले आहे. तर शिवसेनेकडून महापौर पदासाठी ०४ तर काँग्रेस कडून अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदासाठी ०१-०१ अर्ज, राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भाजपकडून महापौर पदासाठी दिनकर आढाव, शशी जाधव, सतीश कुलकर्णी, भिकूबाई बागुल यांनी अर्ज तर उपमहापौर पदासाठी अरुण पवार, गणेश गीते, अलका अहिरे, भिकूबाई बागुल, शिवसेनेकडून महापौर पदासाठी अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, विलास शिंदे तर काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी शाहू खैरे, हेमलता पाटील, तर राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी सुफी जीन यांनी अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान यावेळी अर्ज दाखल करतांना भाजपच्या नगरसेविका सौ. सुनीता पिंगळे व कमलेश बोडके यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत जात उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच भाजपने यावेळी ज्यांना पद नाहीत अशा उमेदवारांना संधी दिल्याचे दिसून आले.

महापौर पदासाठी भाजप ०६,शिवसेना ०४, काँग्रेस ०१ अशा अकरा उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया केली आहे. तर उपमहापौर पदासाठी भाजप ०६, राष्ट्रवादी ०१, काँग्रेस ०२, शिवसेना ०१ अशा दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

महापौर पदासाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार :
दिनकर आढाव, शशी जाधव, राहुल दिवे, सतीश कुलकर्णी, गणेश गीते, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, कमलेश बोडके, विलास शिंदे, भिकूबाई बागुल.

उपमहापौर पदासाठी अर्ज केलेले उमेदवार :
सुफी जीन, शाहू खैरे, हेमलता पाटील, गणेश गीते, अलका अहिरे, भिकूबाई बागुल, अरुण पवार, सुनीता पिंगळे, कमलेश बोडके, विलास शिंदे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!