Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

तीनशे प्लस जागा मिळतील असे वाटले नव्हते गिरिश महाजन :

Share

नाशिक । प्रतिनिधी
केंद्रात नरेंद्र मोदी यांनी प्रचंड बहुमत मिळवत सरकार स्थापन केले असले तरी पक्षाला लोकसभेत तीनशे प्लस जागा मिळतील, असे वाटले नव्हते असे विधान भाजपा नेते व जिल्ह्याचे पालकंमंत्री गिरिश महाजन यांनी केले. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी जागांचे अर्ध शतक देखील पुर्ण करु शकणार नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

भाजप महिला मोर्चाच्या दोन दिवसीय महिला मेळाव्याचा रविवारी (दि.30) समारोप झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी केवळ लाट नव्हती, तर मोदी नावाची त्सूनामी होती. गेल्या पाच वर्षांत सरकारने केलेल्या कामाची पावती मतदारांनी दिली. आता राज्यातही मुख्यमंत्री फडणवीस यांचीच हवा आहे. सरकारने पारदर्शक काम केले. वर्षांनुवर्ष प्रलबिंत पडलेले प्रश्न त्यांनी मार्गी लावले. देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग वाढली आहे.

कॉग्रेस व राष्ट्रवादीत नेत्यांचा जीव रमत नाही. विधानसभेत पहिल्या बाकावर बसणारे विरोधातील नेतेसुद्धा भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष पद स्विकारण्यास कोणी धजावत नाही, या शब्दात त्यांनी विरोधकांना चिमटे काढले. आगामी निवडणुकीत काँग्रेस, राष्टलवादीला 50 जागाही मिळणार नाहीत.

राहुल गांधी यांचा अमेठित पराभव केला. मात्र बारामतीमध्ये थोडे कमी पडलो असलो, तरी अनेक दिग्गजांना नेस्तनाबूत केले. माजी मुख्यमंत्री, त्यांच्या मुलांना पराभूत केले. तर अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यां माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात 50 वर्षांत निघाले नाही, एवढे मोर्चे निघाले़. मराठा आंदोलनासह अनेक मोर्चे झाले. त्या सर्वांवर सरकारने तोडगा काढला. आरक्षणाविषयी न्यायालयाने निर्णय दिल्याने विरोधकांचे तोंड बंद झाले. पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करतान ते म्हणाले, पदाधिकार्‍यांनी, लोकप्रतिनिधींनी लोकसेवेसाठी नेहमी तत्पर असले पाहिजे.

जमिनीवर राहून काम करा. परिश्रम केल्याशिवाय कोणालाही संधी मिळणार नाही, असे धडे त्यांनी यावेळी दिलेे. याप्रसंगी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. माधवी नाईक, खा. भारती पवार, महापौर रंजना भानसी, आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, सीमा वाघ, प्रदेश प्रभारी पूजा मिश्रा, ज्येष्ठ नेत्या कांताताई नलावडे, नीता केळक र, उमा ठाकरे, रोहिणी नायडू आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!