Type to search

Breaking News टेक्नोदूत नाशिक मुख्य बातम्या

आधार कार्डच्या सुरक्षतेसाठी आता ‘बायोमेट्रिक लॉक’; जाणून घ्या सविस्तर

Share

नाशिक : आधारकार्ड हे आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाचे साधन झाले आहे. विविध ठिकाणी आपले ओळखपत्र म्हणून आधारकार्ड वापरता येते. पॅनकार्डला लिंक केल्यानंतर आता आधार हे मतदानकार्डला देखील लिंक करावं लागणार आहे. परंतु आता आधारचा डेटा लीक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यावर उपाय म्हणून यूआयडीएआयने आता प्रत्येक आधार धारकाला स्वतःच बायोमेट्रिक लॉक लावून आपली वैयक्तिक माहिती संरक्षित करता येण्याची सुविधा देऊ केलेली आहे

दरम्यान आधार कार्डच्या अनिवार्यतेची व्यापकता केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने वाढवत आहे. पॅनकार्ड, सीमकार्डपासून सरकारी अनुदानापर्यंत ‘आधार’ सक्ती केल्यानंतर आता केंद्र सरकारने मृत्यूच्यादाखल्यासाठीही ‘आधार’ सक्ती,अनुदानासाठी आश्रमशाळांना “आधार’सक्ती, रेशन दुकानांमध्ये अनुदानावर मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी ‘आधार’ सक्तीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

तसेच मागासवर्गीय आणि दिव्यांगांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठीही आधार सक्तीचे करण्यात आले आहे. म्हणजेच बँक खाते सुरू करण्याकरिता, पासपोर्ट काढण्याकरिता, गॅस सिलिंडर सबसिडी, रेशनिंग, एसटीच्या पाससवलतीकरीता आधार सक्तीचे केलेले आहे .

‘आधार’ माहिती कशी लॉक करावी
*यूआयडीएआयच्या www.uidai.gov.in या वेबसाइटवर गेल्यानंतर Lock/Unlock Biometrics या पर्यायावर क्लिक करा.

*क्लिक केल्यावर Lock/Unlock Biometrics हे वेगळे पेज उघडेल.

*आता या उघडलेल्या पानावर तुमचा १२ आकडी आधार क्रमांक टाइप करा. आणि त्यानंतर सिक्युरिटी कोड टाइप करा.

*यानंतर तुमच्या आधारकार्ड साठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर वनटाइम पासवर्ड (ओटीपी) येईल.

*मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी टाइप करून लॉगइन होऊन सिक्युरिटी कोड पुन्हा टाइप करा. अशाप्रकारे लॉक ऑन होईल.

*लॉक ऑन झाल्यानंतर संबंधित वेब साइटवर तुमची बायोमेट्रिक नाहिती लॉक झाली आहे, असा मेसेज येईल.लॉक ऑन असताना तुम्ही बायोमेट्रिक पडताळणी करू शकणार नाही.

‘आधार’ माहितीचे लॉक कसे उघडावे

*यूआयडीएआयच्या www.uidai.gov.in या वेबसाइटवर जाऊन ओटीपीच्या साह्याने लॉगइन करावे .

*लॉगइन झाल्यानंतर सिक्युरिटी कोड टाइप करावा .

*त्यानंतर उघडणाऱ्या पानावर Disable या बटनावर क्लिक करावे .

अशाप्रकारे बायोमेट्रिक लॉक उघडून तुमची बायोमेट्रिक माहिती तुम्हाला कामानिमित्त आधारसंलग्नतेसाठी वापरता येईल. या माहितीचा वापर झाल्यावर पुन्हा बायोमेट्रिक लॉक लावता येते .

– प्रा. योगेश अशोक हांडगे  

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!