बिग बाजारची आजपासून ‘सहा दिवस महाबचत’ योजना
Share

नाशिक । प्रतिनिधी
फ्यूचर ग्रुपच्या बिग बाजारतर्फे ग्राहकांना स्वस्तात खरेदीचा आनंद देणार्या 6 दिवस महाबचत योजनेला शनिवार(दि.10)पासून प्रारंभ होत आहे. फळे, भाज्या, किराणा सामान, कपडे, पादत्राणे, किचनवेअर पासून होम आणि इलेक्ट्रॉनिक अप्लायेन्सची सर्व उत्पादने एकाच छताखाली सवलतीच्या दरात खरेदीची संधी महाबचत योजनेमध्ये मिळणार आहे.
देशाच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून होणार्या महाबचत योजनेत पहिल्या दिवशी (दि.10) बिगबाजारचे नोंदणीकृत सदस्य, दिव्यांंग आणि युवावर्गासाठी विशेष अतिरिक्त ऑफर्सची संधी असून यादिवशी खरेदीसाठी म्हणून‘एक्सक्ल्यूसिव्ंंह प्रिव्ह्यू’ असणार आहे.
महाबचत योजनेअंतर्गत एका वस्तुच्या खरेदीवर दुसरी मोफत, पुरुष आणि महिलांच्या कपड्यांंवर 20 टक्के कॅशबॅक आणि फर्निचर खरेदीवर 60 टक्क्यांपर्यंत सूट तसेच अतिरिक्त 20 टक्के कॅशबॅक दिला जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीसाठी बँक अर्थसाहाय्य देखील मिळणार आहे.
ग्राहकांना 3 हजार तसेच 6 हजारांच्या खरेदीवर अनुक्रमे 1200 आणि 2300 रुपये फ्यूचर पे व्हॉलेटमध्ये कॅशबॅक मिळणार आहे. यासह 25 हजार आणि त्यावरील खरेदीवर अतिरिक्त 21 रुपयांचा कॅशबॅकही दिला जाणार आहे. एसबीआय डेबिट अथवा के्रडिट कार्डद्वारे खरेदीवर ग्राहक अतिरिक्त 7 टक्के सूट मिळवू शकतील. 15 ऑगस्टपर्यंत सुरू असलेल्या महाबचत योजनेचा लाभ घेऊन भरपूर खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.