‘बिग बाजार’ तर्फे ‘सर्वात स्वस्त पाच दिवस’ ऑफर

0

नाशिक । प्रतिनिधी
बिग बाजारतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्राहकांसाठी ‘सबसे सस्ते 5 दिन’ योजनेचे आयोजन करण्यात आले आहें. याअंतर्गत ग्राहकांना 20 टक्के अधिक स्वस्त दर शिवाय तितकाच कॅशबॅक मिळणार आहे. दि. 23 ते 27 जानेवारीदरम्यान देशातील सर्व बिग बाजार दालनात मिळणार्‍या या ऑफरमध्ये ग्राहकांना त्याच्या ‘रुपेकार्ड’द्वारे 500 रुपयांच्या खरेदीवर 7 टक्के अधिक डिस्काऊंट तसेच 5 हजारांच्या खरेदीवर 10 टक्के सूट दिली जाणार आहे. विशेेष ग्राहकांसाठी 21 आणि 22 जानेवारीला 1 हजाराच्या खरेदीवर 100 रुपयांची सूट दिली जाणार आहे.

पेटीएम ई-गिफ्ट व्हाऊचर्स योजनेमध्ये ग्राहकांना 50 टक्के कॅशबॅक आणि त्याच्या गिफ्ट व्हाऊचर्सवर खरेदी केल्यास सूट तसेच 20 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. रुपये 3 हजारांच्या खरेदीवर ग्राहकांच्या फ्यूचर पे व्हॉलेटमध्ये20 टक्के अतिरिक्त कॅशबॅक जमा होणार असून, सोबत 10 टक्क्यांंची विशेष सूटही मिळणार आहे.

बिग बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव नायक म्हणाले, सर्वात स्वस्त पाच दिवस ऑफरसाठी ग्राहक प्र्रतीक्षेत असतात. या योजनेचे ते उत्साहाने स्वागत करतात. आम्ही त्याच्या पैशाचे मोल जाणतो म्हणूनच खरेदीवर 20 टक्के सूट ऑफरसह कॅशबॅक त्याच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे हा देशातील सर्वात मोठा शॉपिंग महोत्सव ठरणार आहे.
सबसे सस्ते पाच दिन योजनेचा लाभ घेऊन पैशात बचत करावी, असे आवाहन बिग बाजारतर्फे करण्यात आले आहे.

याही आकर्षक योजना
महिला, पुरुषांची तसेच बालकांच्या कपडे खरेदीवर 50 टक्के सूट शिवाय कॅशबॅक फर्निचर उत्पादनांवर 60 टक्क्यांपर्यंत सूट, तसेच 20 टक्के अतिरिक्त कॅशबॅक, सुटकेस, ट्रॉलीच्या काही ठरावीक श्रेणीवर 60 टक्के डिस्काऊंट तसेच 20 टक्के कॅशबॅक.

LEAVE A REPLY

*