Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नरच्या पूर्व भागासाठी वरदान ठरलेले भोजापूर धरण ओव्हरफ्लो

Share

सिन्नर : गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने पूर्व भागासाठी वरदान ठरलेले भोजापूर धरण (दि. २) मध्यरात्री ओव्हरफ्लो झाले.

दरम्यान दरवर्षी धरण ओव्हरफ्लो होण्याची डेटलाईन १५ ऑगस्ट असल्याने यंदा मात्र म्हाळुंगी च्या पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने तब्बल दोन आठवडे अगोदरच धरण ओसंडून वाहू लागले आहे.

धरण लाभ क्षेत्रात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अपेक्षित पर्जन्यमान न झाल्याने पूर्व भागातील नद्या, बंधारे कोरडे असून भोजपुरच्या पुर पाण्याने पूर्व भागाला दिलासा देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!