PhotoGallery | Video : भीम जयंतीची जोरदार तयारी; जयभीमचा नारा दुमदुमणार

0

नाशिक । प्रतिनिधी
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती साजरी करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर शहरात अभूतपूर्व उत्साह दिसून येत असून, उद्या (दि . 14) एप्रिल रोजी अभिवादन, वाहनरॅली, मुख्य मिरवणुकीसह विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती साजरी करण्यासाठी शहर सजले आहे. ठिकठिकाणच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांजवळ आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विविध चौकाचौकात आणि घराघरांवर निळे ध्वज उभारण्यात आले आहेत. यंदा निळ्या रंगाचे आकाशकंदील लावण्यात आले आहेत. जयंतीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाईने शहर उजाळून निघाले होते.


बाजारपेठेतही सजावटीचे विविध साहित्य खरेदीसाठी शहरवासीयांची झुंबड उडाली होती. नवीन कपडे खरेदीसाठीही गर्दी होती. दुचाकी, चारचाकी वाहनांवर व रिक्षांवर निळे ध्वज लावण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उद्या सकाळी शहर परिसरात आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी प्रत्येक कॉलनीत आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. कॉलनीच्या मैदानात मंडप टाकण्यात आले आहेत. शालिमार परिसरातील डॉ. आंबेडकर यांचा पुतळा परिसर विद्युत रोषणाईने उजाळून निघाला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी नागरिक रात्री गर्दी करीत आहे. यंदाही जयंंतीउत्सव समितीकडून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली.

आडगाव परिसर
आडगाव येथील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील दोन दिवसांपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण वसतिगृहाला विद्युत रोषणाई करण्यात आली असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

*