Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

अंबड : भाऊबीजेला निघालेल्या भावाचा अज्ञातांकडून खून

Share

नवीन नाशिक प्रतिनिधी : आशिर्वादनगर अंबड परिसरात चार ते पाच जणांनी एका युवकास मारहाण करून त्यास गळफास देवून ठार मारल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अंबड पोलीसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार , रमेश दगा वानखेडे (41, रा. पांडुरंग कृष्णा रोहाऊस, आशिर्वादनगर, अंबड) हे. मंगळवारी दरवर्षीप्रमाणे रमेश आणि त्याचा भाऊ अमृत हे दोघेजण संगमेश्वर येथे भाऊबीज निमित्ताने बहिणीकडे जाणार होते. भाऊ रमेश यास फोन केला असता त्याने फोन न उचलल्याने अमृत हा थेट बहिणीकडे जाण्यासाठी निघाला मात्र रस्त्यात भाऊ सिरीअस असल्याचा फोन आल्याने तो पुन्हा जिल्हा रुग्णालयात आला.

त्यावेळी त्याला समजले की, सोमवारी (दि. 28) रोजी रात्री काही अज्ञात चार ते पाच इसमान्नी रमेश यास मारहाण करून त्याला गळ्याला फास लावून पख्याला बाधून ठेवल्याचे समजले. त्यानंतर अमृत याने याबाबतची माहिती अंबड पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.

यानंतर अमृत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार ते पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वपोनि श्रीपाद परोपकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!