Type to search

नाशिक

भगूरला यंदाही वृक्षारोपणाने वटपौर्णिमा साजरी

Share

नाशिक : वटपेर्णीमा निमित्त जन्मो जन्मी हाच पती मिळावा महणुन महिला वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पुजा करतात पण त्या झाडाचे संगोपन करणे ही आज काळाची गरज बनली आहे.

वडाच्या झाडाची संख्या काळानुसार कमी कमी होत चालली असून ह्या परंपरा सांभाळत असताना एक नवीन प्रथा गेले ५ वर्ष भगुर मध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी सुरु केली आहे.

दरम्यान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करून वटपौर्णिमा सण साजरा करण्यात आला. यावेळी वटपुजा करायला आलेल्या महिलांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. या वेळी प्रेरणा बलकवडे, सुष्मा गायकवाड, भारती बलकवडे, शितल बलकवडे, वैशाली भदाणे व इतर भगुर परिसरातील महिला उपस्थित होत्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!