Thursday, April 25, 2024
Homeनाशिकतुम्हीही इथे क्लिक करून मागवू शकता घरपोच किराणा

तुम्हीही इथे क्लिक करून मागवू शकता घरपोच किराणा

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु असली तरीदेखील मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडताना नजरेस पडतात. त्यामुळे नाशिक महापालिकेकडून नाशिककरांच्या सोयीसाठी घरपोच किरणा माल मागविता येईल असे मोबाईल अॅप सूचित करण्यात आले आहे. यावर नाशिकमधील किराणा दुकानदारांची नावे असून याठिकाणी ऑनलाईन ऑर्डर देता येणार आहे.

- Advertisement -

या मोबाईल अॅपचे नाव नाशिक बाजार(Nashik Bazzar) असे आहे. याठिकाणी नाशिककरांना जीवनावश्यक व दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळू शकणार आहेत.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना घराबाहेर न पडता सध्या सोप्या पद्धतीने वस्तू घरपोच मिळाव्यात यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.

किराणा दुकानामध्ये होणारी गर्दी थांबावी, लोकांना घरपोच माल मिळावा यासाठी नाशिक महानगरपालिका तर्फे व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड अॅग्रीक्लचर यांचे संयुक्त विदयमाने अल्टालिएंट इन्प्फोटेक ने ‘नाशिक बाजार’ हे मोबाईल ॲप तयार केले असून ते सर्वासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे.

या ॲपमध्ये नाशिक मधील किराणा दुकानादारांनी व नागरिकांनी नोंदणी करुन त्यावर आपल्या मालाची मागणी नोंदविल्यावर त्याभागातील दुकानदार आपले ऑर्डर नोंदवुन मालाची घरपोच डिलिव्हरी करतील.

हे ॲप नाशिक मनपाच्या www.nmc.gov.in या संकेतस्थळावर ‘Nashik Bazzar’ या नावाने उपलब्ध आहे. किंवा खालील लिंकवरून नाशिककरांना अप डाउनलोड करता येईल. https://nashikcorporation.in/images/nashikbazzar/NashikBazzar.apk

- Advertisment -

ताज्या बातम्या