Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

चिंचोक्याचा व्यवसाय करून ‘तो’ झाला करोडपती

Share

नाशिक : जगात कोणत्या गोष्टीचे सोन होईल सांगता येत नाही. परंतु त्यासाठी त्या वस्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असणे आवश्यक आहे. कारण एका तरुणाने चक्क चिंचोक्याचा व्यवसाय करून तो करोडपती झाला आहे. बार्शी येथील अतुल सोनिग्रे असं त्या तरुणाचं नाव आहे.

१९६९ साली सोनिग्रेच्या आजोबानी हा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी चिंचोके भाजून त्याची कुंकू तयार करण्यासाठी पावडर तयार केली जात असे. आज अतुल यांनी वेगळा विचार करत यात बदल घडवून आणला. त्यांनी त्याच पद्धतीने चिंचोके भरून तयार केलं जातात. पण या चिंचोक्यांचा उपयोग सुती कपडे तयार करताना वापरला जातो. या व्यवसायातून आज करोडोंची उलाढाल होत आहे. यासाठी त्यांनी बार्शी येथे चार प्लांट तयार केले आहेत.

या व्यवसायात एका वर्षाला १ हजार पोते चिंचोके म्हणजेच १० हजार टन चिंचोके वापरले जातात. तसेच प्लान्टवर ८० कामगार काम करीत आहे. अतुल यांच्या तीन पिढ्या हा व्यवसाय करीत असल्याने यात सातत्याने बदल होत आहे. अतुल सोनिग्रे यांनी अतुल सीड्स नावाची कंपनी देखील स्थापन केली आहे. लवकरच नवीन प्लांट तयार करणार असल्याचे अतुल सोनिग्रे यांनी सांगितले.

….अशी तयार केली जाते
सुरवातीला चिंचोके गोळा केले जातात. ते भाजून त्यावरील आवरण वेगळे केले जाते. पुढे अति भाजलेले चिंचोके संगणकाच्या माध्यमातून वेगळे केले जातात. पुन्हा सुपर फाईन’ चिंचोके बाजूला केले जातात. त्यानंतर मशीनच्या साहाय्याने बारीकी चूर्ण केले जाते. पुन्हा या बारीक चूर्णाचे अतिशय सुक्ष्म पावडर तयार केली जाते. अशा पद्धतीने तयार करून भारतातील सर्व टेक्स्टटाइल मार्केटला हि पावडर पुरविली जाते. या पावडरचा उपयोग सुटी कपडे तयार करताना केला जातो.

आपल्या परिसरातील कोणत्याही वस्तूतुन पैशाची आणि रोजगाराची निर्मिती करता येते. हा परंपरागत व्यवसायाला अत्याधुनिक स्वरूप दिले. त्यामुळे मार्केटिंगमध्ये देखील बदल करण्यात आले. अपडेट मशिनरी, अपडेट स्टाफ यामुळे काळानुरूप बदलत गेल्याने या व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. पुढच्या पिढीच्या हातात चांगला उद्योग देणे हे सुद्धा महत्वाचे आहे.
अतुल सोनिग्रे, अतुल सीड्स,उद्योजक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!