नाशिक बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. नितीन ठाकरे  

0

नाशिक तालुका आणि जिल्ह्यातील वकीलांची संघटना असलेल्या नाशिक बार असोसिएशनच्या (नाशिक वकिल संघाच्या) अध्यक्षपदी ॲड. नितीन ठाकरे यांची निवड झाली.

असोसिएशनच्या निवडणुकीत त्यांना सर्वाधिक मते मिळाली. अॅड प्रकाश आहुजा यांची  उपाध्यक्ष पदी निवड झाली.

जिल्हा न्यायालयातील नाशिक बार असोसिएशन कार्यकारिणीच्या 11 जागांसाठी काल झालेल्या मतदान प्रक्रियेत ८३.६ टक्के मतदान झाले होते.

एकूण 3 हजार 42 पैकी 2 हजार 543 वकिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला़.

नाशिक बार असोसिएशन निवडणुकीत अ‍ॅड. एस. जी. सोनवणे, अ‍ॅड. व्ही. एन. जुन्नरे, अ‍ॅड. मनीष बस्ते यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले होते.

आज सकाळी आयटी लायब्ररीत बुधवारी सकाळी 9 पासून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सहसचिव (महिला) या पदांसाठीची मतमोजणी झाली.

दरम्यान उद्या गुरुवारी (द़ि 13) सकाळी 9 वाजता खजिनदार, सदस्य, महिला सदस्य, सात वर्षांखालील वकील सदस्य पदाची मतमोजणी सुरू होईल.

LEAVE A REPLY

*