विधिज्ञ, बार असोसिएशनकडून कोपर्डी निकालाचे स्वागत

0

नाशिक । दि. 29 प्रतिनिधी
कोपर्डी निर्भया आत्याचार व खून प्रकरणी आज न्यायालयाने तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेच्या माध्यमातून न्यायिकदृष्ट्या पुरावे व शिक्षेच्या तरतुदीनुसार फाशी अपेक्षीत होतीच.

परंतु यासह यातून समाजामध्ये महिला व मुलींवर आत्याचार करणार्‍या नराधमांंना अशीही शिक्षा होऊ शकते याचा योग्य असा कडक संदेश नव्हे तर तसा धडाच दिला गेला असल्याचे मत विधिज्ञांनी देशदुतशी बोलताना व्यक्त केला. त्यांच्यासह नाशिक बार असोसिएशन व सर्वच वकिलांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कोपर्डी प्रकरणानंतर राज्यामध्ये जी संतापाची लाट उसळली व यातून राज्यभरात जे विराट मोर्चे निघाले यामुळे हा खून खटला केवळ निर्भया व तीच्या कुटुबियांशी सबंधीत राहिला नव्हता तर राज्यभरातील मुली व महिलांना हा खटला आपला वाटत होता.

याचा परिणाम म्हणून विराट मोर्चे निघाले तसेच त्या नराधमांना शिक्षाच झाली पाहिजे अशी मागणी सर्वच स्थरातून होत होती. सरकारी वकिल अ‍ॅड. उज्वल निकम यांनी प्रखरपणे मांडलेली बाजु यासह या खटल्यातील अधिकार्‍यांनीही उत्कृष्ट असा तपास करत. योग्य पुरावे सादर केले. यामधून विरोधी पक्षाच्या वकिलांना काही त्रुटी मिळू शकल्या नाहीत. अखेर न्यायालय लोकभावनांपेक्षा पुराव्यांना महत्व देते. यामुळे हा निकाल हे सर्वांचे यश आहे असे मत विधिज्ञांनी मांडले.

जास्तीत जास्त न्याय
आरोपींनी केलेले कृत्य व हत्या हे वेगळ्यात वेगळ्या गुन्ह्यात मोडते. त्यांनी केलेले कौर्य, विकृतपणा गृहुणास्पद आहे यामुळे पिडीतेबाबात जास्तीत जास्त न्याय झाला आहे. तसेच असे कृत्य करणारांविरोधात सामाजात योग्य असा संदेश गेला आहे.
– अ‍ॅड. जयंत जायभावे, सदस्य महाराष्ट्र- गोवा बार असोसिएशन

दोन्ही उद्देश साध्य
गुन्हा केला म्हणून आरोपींना शिक्षा होणे हा एक उद्देश आहे. तर त्यांना मिळालेल्या शिक्षेद्वारे असे गुन्हे करू पाहणारे अथवा ज्यांच्या मनात असे काही असेल तर त्यांना या शिक्षेची धास्ती वाटून ते यापासून परावृत्त होणे. असे दोन्ही उद्देश या निकालाने साध्य केले आहेत.
– अ‍ॅड. अविनाश भिडे, सदस्य महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन

नराधमांना दहशत
हा निकाल समाजात एक चांगला संदेश देणारा ठरला आहे. याचे सर्व वकिल स्वागत करत आहेत. यासह यामध्ाून असे कृत्य करणारांसाठी त्यांच्या मनात दहत असणारा योग्य असा संदेश दिला गेला आहे. पिडीत निर्भयाला यातून योग्य असा न्याय मिळाला असे वाटते.
– अ‍ॅड. नितिन ठाकरे, अध्यक्ष नाशिक बार असोसिएशन

महिलांना सक्षम करणारा
सामान्य जनता न्यायालयास न्याय देवता मानते. या न्यायदेवतेने परखड, स्पष्ट भूमिका घेऊन दिलेला हा न्याय आहे. यासह समाजातील मुली व महिलांच्या मनात अशा घटनांनी जी असुरक्षितता निर्माण झाली होती. यामध्ये त्यांना मोठा आधार देणारा तसेच त्यांना सक्षम करणारा ऐतिहासीक निर्णय आहे.
– अ‍ॅड. शामला दीक्षित, सदस्य बार असोसिएशन

नराधमांना वचक
कोपर्डी प्रकरणानंतर समाजात उमटलेले प्रतिसाद व एकुण साक्षी पुरावे पाहता हा अपेक्षीत असा निकाल आहे. याबरोबरच तो समाजात योग्य संदेश देणारा तसेच नराधमांना वचक बसवणारा निकाल आहे.
– अ‍ॅड. संजय गिते, सचिव बार असोसिएशन

 

LEAVE A REPLY

*