बँकेच्या सुटीबाबत व्हायरल झालेला ‘तो’ मेसेज खोटा

0

नाशिक | प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर पाच दिवसांच्या आठवड्याबाबत उलटसुलट चर्चांना ऊत आला होता. रिझर्व्ह बँकेने महिन्यातील प्रत्येक शनिवारी बँकांना सुटी जाहीर केल्याच्या अफवेचा यात समावेश होता.

सोशल मीडियावर सातत्याने फिरणार्‍या या अफवेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. बँक कर्मचार्‍यांच्या संघटनांकडून सातत्याने पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय लागू केल्याचे वृत्त पसरले होते.

यावर आता बँकेने आपली भूमिका जाहीर केली असून, पाच दिवसांचा आठवडा करण्याचा कोणताही आदेश जारी केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोशल माध्यमांवर सातत्याने बँकांच्या शाखा आठवड्यात पाच दिवस कार्यरत राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मात्र, हे वृत्त खरे नसून बँकांच्या शाखा दरमहा केवळ दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारीच बंद राहणार आहेत. सोशल माध्यमांवर कुणीतरी खोडसाळ वृत्ती असलेल्याने बनावट फोटो पोस्ट करून हा मेसेज व्हायरल केला.

LEAVE A REPLY

*