पुढील दोन दिवस बँका बंद असणार

0

नाशिक । प्रतिनिधी
आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील 10 मध्यवर्ती कामगार संघटना,कामगार-सेवकांचे स्वतंत्र महासंघ, बँक,विमा,दळणवळण,संरक्षण, रेल्वे,तेल, खान, पोलाद,शिक्षण आदी उद्योगातील कामगार, राज्य सरकारी, केंद्र सरकारी सेवक,सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील कामगार,शेती क्षेत्रातील कष्टकरी, असंघटित कामगार प्रतिनिधी यांनी दि.8 व 9 जानेवारी रोजी दोन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे या संपात बँकिंग उद्योगातील ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन तसेच बँक एम्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनाही सहभागी होणार आहेत.त्यामुळे दोन दिवस बँका बंद राहणार आहेत.

बँकिंग उद्योगांचे खासगीकरण करण्याचे सरकारतर्फे नव्याने प्रयत्न केला जात आहे. बँकिंग उद्योगात सहयोगी बँकांचे स्टेट बँकेत विलीनीकरण आणि आता विजया बँक ऑफ बडोदा या बँकांच्या एकत्रीकरण याच्या माध्यमातून सरकार आपले एकत्रीकरणाचे धोरण पुढे रेटत आहे.याशिवाय सरकारचे आर्थिक निर्णय,निश्चलीकरण,जीएसटी, एफआरडीआय यामुळे उद्योगात एकतेचे वातावरण निर्माण झाले आहे .

बँकींगला कमकुवत करण्याचे प्रयत्न
नवीन खासगी बँका,पेमेंट बँका, स्मॉल फायनान्स बँका यांना दिलेल्या परवाण्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकींगला कमकुवत करण्याचे प्रयत्न होत आहेत. याविरोधात दि.8 व 9 जानेवारी असा दोन दिवस बँक सेवक संपात सहभागी होणार असल्याची माहिती ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन नाशिक युनिटचे जनरल सेक्रेटरी शिरीष धनक,किसनराव देशमुख यांनी दिली.

LEAVE A REPLY

*