Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशकात राजकीय भूकंप; बाळासाहेब सानप यांनी घड्याळ काढत हाती बांधले शिवबंधन

Share

नाशिक : भाजपाने तिकीट नाकारल्याने राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढविणारे बाळासाहेब सानप यांनी रविवारी (दि.27) ‘मातोश्री’ गाठत शिवसेनेते प्रवेश केला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सानप यांनी शिवबंंधन बांधले. अवघ्या वीस दिवसात सानप यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत घेतलेली उडी चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, पुढील काळात चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी सानप यांनी हाती शिवबंधन बांधल्याचे समजते.

नाशिक पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना भाजपाने उमेदवारी नाकरली होती. त्यांच्या ऐवजी अ‍ॅड.राहुल ढिकले यांना तिकीट देण्यात आले होते. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली होती. तर, खा.अमोल कोल्हे यांनी रोड शो केला होता. मात्र, निवडणुकीत अ‍ॅड.ढिकले यांनी सानप यांचा 12 हजार मतांनी पराभव केला.

शुक्रवारी (दि.25) राष्ट्रवादी भवन येथे माजी उपमुख्यमंत्री आ.छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला त्यांनी हजेरी देखील लावली होती. मात्र, त्यानंतर दोन दिवसात त्यांनी मनगटावरील राष्ट्रवादीचे घड्याळ काढत शिवबंधन बांधले. त्यांचा हा प्रवेश राजकीय वर्तुर्ळात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी सोडण्याचे कारण समजू शकले नसले तरी पुढील काळात चौकशीचा जाच नको म्हणून त्यांनी सेनेत प्रवेश केल्याची चर्चा रंगली आहे.

खा.राऊत यांचा आशीर्वाद
सानप यांच्या सेना प्रवेशाला खा.संजय राऊत यांचा आशीर्वाद असल्याचे समजते. निवडणुक प्रचार काळात पंचवटीतून जात असताना खा.राऊत यांनी सानप यांच्या घराचा पाहुणचार घेतला होंता. सानप आमचे जुने सहकारी असल्याचे विधान खा.राऊत यांनी केले होते. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता देखील खो.राऊत यांच्या पुढाकाराने सानप यांनी सेनेत प्रवेश केल्याचे समजते.

महापालिकेतील गणिते बदलणार
भाजपचे सर्वाधिक नगरसेवक हे पंचवटी प्रभागात आहे. या ठिकाणी सेनेची संघटनात्मक बांधणी कमकुवत असून पक्षाचा एकच नगरसेवक आहे. पुढील काही दिवसात महापालिका महापौर निवडणूक होणार आहे. 122 सदस्य असलेल्या सभागृहात भाजपकडे 66 इतके काठावरील बहुमत आहे. सानप यांच्यामुळे पंचवटीतील काही नगरसेवक सेनेत प्रवेश करु, शकतील असे बोलले जाते. त्यामुळे भाजप समोर अडचणी निर्माण होऊ शकतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!