Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Photogallery : बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट; काही ठिकाणी उत्साह

Share

विखरणी वार्ताहर : विखरणी व परीसरात पावसाअभावी दुष्काळग्रस्त परिस्थिती असली तरी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांच्या सजावटीच्या साहित्याच्या दरात या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने व उत्पन्ना अभावी शेतकऱ्यांनी पोळा साध्या वातावरणातच साजरा केल्याचे दिसून आले. कांदा, टोमॅटो व इतर पिकांना अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला आहे.

शेतमालाला अत्यल्प भाव मिळत असल्याने याचा प्रातिनिधिक निषेध म्हणून शेतकऱ्यांनी बैलाच्या पाठीवर विविध प्रकारचे चित्र रंगवुन शासनाचा निषेध केला आहे तर काही ठिकाणी दुष्काळाचे वास्तवही बैलाच्या पाठीवर दिसून आले आहे. एकंदरीतच पोळा अनुउत्साहात साजरा झाल्याचे दिसून येत आहे.

व्हिडीओ : सतीश देवगिरे

तर जिल्ह्यात काही ठिकाणी उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात आला. परंपरेक पद्धतीने मिरवणूक काढून त्याचा औक्षण करण्यात आले. त्यांना पूर्ण नैवद्य दाखवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!