Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळा : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शेतकऱ्यांच्या बांधावर !

Share

लोहोणेर : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदे, मकई बाजरी आदी शेतमालाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असुन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावुन घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दरम्यान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे जिल्हा दौऱ्यावर असतांना बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाळासाहेब रकीबे व दिनेश रकीबे यांच्या शेतात बेहत दिली. यावेळी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ३० एकर द्राक्षेबागेची पाहणी करत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

तसेच दिनेश रकिबे यांनी अर्ली द्राक्षाच्या पिकविमा कालावधी बाबत अडचण मांडताना सदर पिकविमा हा ९ आॕक्टोबर पासुन लागु होत असल्याने त्याआधीच अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. यामुळे अर्लीद्राक्षांना हा विमा लागु होतांना अडचण येत आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै ते आॕक्टोबर महिन्यात अर्लीद्राक्ष सिझन सुरू होतो व छाटणीचा कालावधी आॕक्टोबर ते जानेवारी असा असतो. हे सर्व निर्यातक्षम द्राक्ष निघत असतात.

त्यामुळे पिकविम्याचा कालावधी हा ऑगस्ट पासुन फेब्रुवारी पर्यत लागु करण्यात यावा, इतर पिकांप्रमाणे द्राक्ष बागेसाठी पॉलिहाऊस (संरक्षण) कागदासाठी शासनाकडून संरक्षण अनुदान मिळावे, यामुळे रब्बी व खरिप दोन्हीही पिंकांना याचे सरंक्षण मिळेल असे सांगितले. तसेच झालेल्या सर्वच पिकांची नुकसान भरपाई ही शासनाकडुन व पिकविमा कंपनीकडुन लवकरात लवकर मिळावी अशी मागणीही यावेळी उपस्थित असलेल्या शेतकरी वर्गाने खोत यांचेकडे केली.

यावेळी ठेंगोडा व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्यासह प्रांतअधिकारी विजय भांगरे, बागलाण तहसिलदार जितेंद्र इंगळे, कृषीअधिकारी एस.एस.पवार, गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे, पर्यवेक्षक चव्हाण, तलाठी योगेश मेश्राम, कृषी सहाय्यक पुष्पा गायकवाड, ग्रामविकास अधिकारी वाघ यांच्यासह परिसरातील मोठ्याप्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!