Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : शासकीय वसतिगृह विद्यार्थ्यांच्या शोधात, फक्त २८ टक्केच भर्ती

Share

नाशिक | प्रशांत निकाळे : नाशिक शासन अनुदानित मागासवर्गीय विध्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया अतिशय धीम्या गतीने सुरु आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या या वसतिगृहांना विद्यार्थीच मिळेनासे झाले आहेत. प्रत्येक वर्षी वसतिग्रुहांनसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होतात. बहुतेक विध्यार्थ्यांना प्रवेश हि मिळत नाही, मात्र या वर्षी परिस्थिती अगदी उलट झाली आहे.

या संदर्भात विभागाने विद्यार्थ्यांना आवाहन हि केले आहे. विभागाने म्हटले आहे की, “नाशिक शासकीय वसतिगृह प्रवेश 2019-20 सन 2019-20 या वर्षातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील मागासवर्गीय मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकिया सरु झालेली आहेत.

वसतीगृहातील विद्यार्थ्यांना रिक्त जागांच्या अधिन राहून प्रवेश देण्यात येणार आहे. सदर वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शालेयउपयोगी साहित्य, गणवेश व निर्वाह भत्ता सुविधा मोफत दिल्या जातात. सर्व कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय तसेच व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या व शासकिय वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या कार्यालयात संपर्क साधून विनामुल्य प्रवेश अर्ज करुन प्रवेश प्राप्त करुन घ्यावे.”

https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/Scholarships/Account/Login.aspx#1

*वसतिगृह प्रवेशसाठी वरील लिंकवर क्लिक करा*

या वर्षी बहुतेक शैक्षणिक वर्गांच्या प्रवेश प्रक्रिया लांबलेल्या असल्याने ही समस्या उद्भवली असल्याचे प्राथमिक माहिती आहे. अकरावी, विधी, इंजिनिअरिंग अशा सर्वच प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया या अद्यापही सुरूच आहेत. याचाच परिणाम हा वसतिगृह प्रवेशावर झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान वसतिगृहात स्थायिक असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, वसतिगृहात कोणत्याही प्रकारची अडचण नसून पाणी, जेवण व राहण्याची उत्तम सोय आहे. सरकरी यंत्रणेबाबतचा गैर समज येथे दूर होतो.

प्रवेश प्रक्रिया सुरळीत चालू असून प्रवेश प्रक्रियेवर कोणताही फरक पडलेला नाही

-प्राची वाजे, सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण विभाग नाशिक )  

अनुसुचित जाती प्रवर्गासाठी रिक्त जागा

वसतिगृह                                                                                      भर्ती                     रिक्त    एकूण

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन), नाशिक            ६९,                       १८१        २५०

मागासवगीय मुलींचे शासकीय वसतिगृह (जुने) आडगाव, नाशिक       २०                        ८०         १००

मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह (जुने) आडगाव, नाशिक       २२,                        ७८     १००

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगह यूनिट क्र.1 आडगाव, नाशिक   ५६                      १९४    २५०

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्र. 2 आडगाव, नाशिक   ४४,                     २०६    २५०

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्र. 3 आडगाव, नाशिक   ५०                      २००    २५०

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट 4 नाशिक             ७९                 १७१     २५०

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह त्र्यंबकेश्वर                  ३६                       ६४    १००

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!