Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘आयुष्मान भारत’ला त्रुटींचे दुखणे?

Share

नाशिक । अजित देसाई 
‘बिमार नाही लाचार, हो रहा मुफ्त उपचार’ अशी घोषणा करत गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 445 जिल्ह्यांत आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ केला.

देशातील शहरी व ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांसाठी या योजनेतून आजारपणासाठी दरवर्षी पाच लाख रुपयांचे सुरक्षाकवच सरकारकडून देण्यात आले असून देशभरातील 13 हजार रुग्णालये या योजनेत सहभागी झाली आहेत. परिणामी गरिबांना खासगी रुग्णालयात चांगले उपचार मिळणे सुलभ झाले आहे.

कर्करोग, हृदयाचे आजार, किडनी व फुफ्फुसांचे आजार यासह तब्बल 1300 आजारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. सामान्य कुटुंबातील रुग्णांना या योजनेत महागडे उपचार मोफत उपलब्ध होणार असले तरी लाभार्थी निवडताना लावण्यात आलेले निकष व प्रत्यक्ष उपचार मिळवताना जाणवणार्‍या त्रुटींमुळे ही योजना कितपत लाभदायी ठरेल याबाबत शंकादेखील उपस्थित केल्या जात आहेत. आयुष्मान भारतमध्ये शहरी भागातील कचरा वेचक, बांधकाम मजूर, घरकाम करणारे, फेरीवाले, भिकारी आदी 11 वर्गांतील कुटुंबे समाविष्ठ आहेत, तरग्रामीण भागात लाभार्थी निवडताना घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावत्या व्यक्ती, अनुसूचित जाती-जमाती वर्गातील कुटुंबे, भूमीहीन शेतकरी आदी निकष लावण्यात आले आहेत.

योजनेशी जोडल्या गेलेल्या कुटुंबाला देशातील कोणत्याही राज्यात लाभ दिला जाणार आहे. सन 2011च्या जनगणनेतील नोंदीनुसार राज्यातीले 83 लाख 72 हजार कुटुंबांची निवड करण्यात आली असून त्यात नाशिक जिल्ह्यातील पाच लाख तीन हजार 804 कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळाला असून त्यात ग्रामीण भागातील तीन लाख 41 हजार 727 कुटुंबांचा समावेश आह . या कुटुंबांना बारकोड असलेले हेल्थ कार्ड देण्यात येत आहे.

या योजनेद्वारे लाभार्थी कुटुंबीयांना सरकारी रुग्णालयांमध्ये वर्षभरात पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार तसेच योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 971 सेवां व्यतिरिक्त सुमारे 400 आरोग्यसेवा मोफत मिळणार आहेत. असे असले तरी गरिबांसाठी असणार्‍या या योजनेतील त्रुटी देखील समोर येत आहेत.समाविष्ठ असणारी नावे त्रोटक स्वरूपात असून गावातील 30 ते 40 टक्के कुटुंबे लाभास पात्र आहेत. परिणामी ज्यांचा यादीत समावेश नाही त्यांचा योजनेबद्दल राग आहे. हा राग स्थानिक पातळीवर नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका यांच्यावर काढला जातो.

लाभार्थी निवडताना कोणते सर्वेक्षण करण्यात आले, त्यासाठीचे निकष कोणते होते याबाबत सामान्य जनता अनभिज्ञ आहे. !योजनेत अनेक मयत व्यक्तीचा लाभार्थी म्हणून समावेश आहे, कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे नाहीत, एखाद्या कुटुंबात प्रौढ व्यक्ती बाजूला सारून केवळ लहान मुलांची नावे समाविष्ठ झाली आहेत. आधारकार्डची पडताळणी झाल्यावरच योजनेचा लाभ दिला जातो, मात्र अनेकदा इंग्रजी स्पेलिंगचा घोळ होतो. केवायसीसाठीआधारचे ठसे पडताळणी होत नाही. अनेक दिव्यांग, आदिवासी कुटुंबांकडे अद्याप आधार कार्ड नाही, परिमाणी त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागते.

त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न
आयुष्मान भारत योजनेत त्रुटी असल्या तरी त्या इतर करण्याचे प्रयत्न होत आहेत. ज्या पात्र कुटुंबातील सदस्याचे नाव हेल्थ कार्डवर दिसत नसेल ते समाविष्ट करता येईल. तसेच नावातील चुकीची दुरुस्तीदेखील शक्य आहे. मात्र आधारकार्ड वरील नाव त्यासाठी दुरुस्त करून घ्यावे लागेल. योजनेत लाभार्थी निवडतात 2011 च्या आर्थिक, सामाजिक व जातनिहाय गणनेचा आधार घेतला जात असून त्या डाटाबेसवरच यादी प्रसिद्ध झाली आहे.

स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, नगरसेवक अथवा आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांचा यात संबंध नाही. याशिवाय ज्यांना आयुष्मान भारतचा लाभ मिळाला नसेल त्यांच्यासाठी राज्य सरकारची महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे. या योजनेतदेखील 971 प्रकारच्या आजारांवर दीड लाखांपर्यंत मोफत उपचार केले जातात. नाशिकचा विचार केल्यास जिल्ह्यातील २७ खासगी रुग्णालयांमध्ये या दोन्ही योजनांच्या लाभार्थींवर सारखेच उपचार केले जातील, अशी माहिती आयुष्मान भारतचे समन्वयक डॉ. तुषार मोरे यांनी दिली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!