Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

प्रवाशांनो ! मीटर प्रमाणे भाडे नाकारल्यास ‘या’ नंबरवर करा कॉल

Share

नाशिक : ‘रिक्षाचे मीटर प्रमाणे भाडे नाकारल्यास, अरेरावी केल्यास त्वरीत ‘०२५३-२३०५२२८’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा,’ असे आवाहन नाशिक वाहतूक पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान विनापरमीट, विनामीटर तसेच बेशिस्त रिक्षाचालकांवर सोमवार (दि.२५)पासून कडक कारवाई करण्यात येत असून आता ‘रिक्षाचे मीटर प्रमाणे भाडे नाकारल्यास किंवा रिक्षाचालकाने अथवा प्रवाशाने अरेरावी केल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. यासाठी विविध ठिकाणी याबाबत स्टिकर, फलक लावण्यात येत आहेत. जेणेकरून रिक्षाचालकव प्रवाशी यांना याबाबत मार्गदर्शन मिळेल.

शहरात २३ हजारांपेक्षा अधिक रिक्षा धावतात. परमीट तसेच इतर अत्यावश्यक कायदेशीर बाबींचा आढावा घेतला असता हजारो रिक्षा बेकायदेशीर असल्याचे दिसून येते. शहरात रिक्षांची संख्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याने प्रामाणिकपणे व्यवसाय करणार्‍या रिक्षाचालकांची पंचाईत होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी बेशिस्त तसेच नियमबाह्य रिक्षांवर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

हे आहेत हेल्पलाईन क्रमांक :
पोलीस नियंत्रण कक्ष नाशिक शहर
१०० / ०२५३-२३०५२३३/ ०२५३-२३०५२३४

नियंत्रण कक्ष व्हाट्सअँप क्रमांक
८३९०२०९५१८

शहर वाहतूक नियंत्रण कक्ष
०२५३-२३०५२२८

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!