Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वनरक्षकपरीक्षेचा भोंगळ कारभार; गैरहजर असणारे उमेदवार झाले वनरक्षक

Share

नाशिक : महापोर्टल परीक्षेद्वारे घेण्यात आलेल्या वनरक्षकपरीक्षेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. औरंगाबाद येथील वनरक्षक परीक्षेत समोर झाल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी मैदानी चाचणीस अनुपस्थित असणाऱ्या दोन उमेदवारांची थेट निवड करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान महापोर्टल झालेल्या अनेक परीक्षांच्या बाबतीत अशा घटना झाल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी अनेकदा त्याबाबत रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी आंदोलने देखील केली आहेत. त्यातच नुकत्याच जाहीर झालेल्या वनरक्षक परीक्षेच्या निकालावरून ही वादंग उठण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद येथील घडलेल्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. एकूणच महापोर्टवरील विश्वास उडत चालल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. घडला प्रकार असा कि, या ठिकाणी वनरक्षक परीक्षेची मैदानी चाचणी ०४ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. या मैदानी चाचणीत पवनसिंग बाळचंद काकरवाल व कल्याण पुखराज खाकोड अशी दोन विद्यार्थ्यांची नवे आहेत.. तर हे दोन उमेदवार मैदानी चाचणीत गैरहजर असताना दि. ०९ रोजी औरंगाबाद वनरक्षक भरतीचा निकाल लागला तेव्हा निवडयादीत या दोघा उमेदवारांची नावे आढळून आल्याने इतर विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे.

दरम्यान अनुपस्थित राहून सुद्धा उमेदवार अंतिम यादीत निवड झाली आहे. असे जर प्रकार घडत असतील तर अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी काय करायचे, असा सवाल विद्यार्थीवर्ग करत आहे. त्यामुळे वनविभागाचा परीक्षा विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

महापोर्टलच्या असा कारभाराचा प्रथमतः जाहीर निषेध आहे. परीक्षांचा अभ्यास करावा कि नाही असा पेच निर्माण झाला असून यामुळे
मानसिक संतुलन खराब होत आहे. तसेच कितीही अभ्यास केला तरी चीज होणार नाही, अशी भीती देखील निर्माण झाली आहे.
-प्रतीक गरुड, विद्यार्थी

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!