Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

ऑगस्ट क्रांती दिन : भारतीय स्वातंत्र्यासाठी पडलेली ‘क्रांतीची ठिणगी’

Share

नाशिक : भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रज सरकाराला देशातून हद्दपार करण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी संपूर्ण देश पेटून उठला आणि क्रांतीची ठिणगी पडली. या दिवशी अनेक हुतात्म्यांनी आपली बाजी पणाला लावत देशासाठी अमर झाले. याच क्रांतिकारकांच्या स्मृती जपण्यासाठी ‘क्रांती दिन’ पाळला जातो.

याच काळात महात्मा गांधीजींनी ‘छोडो भारत’ व ‘करेंगे या मरेंगे’ चा नारा दिला होता. या घटनेने संपूर्ण देश आंदोलनात सहभागी झाला. यामुळे ऑगस्ट क्रांतिलढ्याला सुरवात झाली. मावळ असणाऱ्या व शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणार्‍या नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा ९ ऑगस्ट क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला.

स्वातंत्रलढ्याची मशाल पेटवून ब्रिटिशांना नेस्तनाबूत करण्यासाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले होते. यावेळी भारतीयांना थांबवयाचे कसे असा जटिल प्रश्न ब्रिटिशांना पडला होता. अशात हे आंदोलन देशभर पसरणार म्हणून 9 ऑगस्टच्या पहाटेच महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासह अनके नेत्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले.

या आंदोलनामुळे भारतीय पेटून उउठल्याने ब्रिटिश भयभीत झाले. या एकाच आंदोलनामुळे देशभरात तीव्र आंदोलने होत असल्याने अनेक नेते अटक करण्यात येऊ लागले. ठिकठिकाणी मोर्चे काढून ब्रिटिशांना जेरीस आणण्याचे प्रयत्न होऊ लागले. अशावेळी नेत्यांनी रेल्वे स्थानके मोडतोड, रूळ उखडणे, पोस्ट कार्यालय जाळणे, वीज तोडणे असा आंदोलनाचा मार्ग अवलंबला. यात देशभरातील युवक, स्रिया, व्यापारी, कामगार अशांनी सहभाग घेतला.

या आंदोलनामुळे देशभर वेगळीच ऊर्जा संचारली होती. देशभर स्वातंत्र्याचे व देशभक्‍तीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच ब्रिटिशांना या आंदोलनामुळेच भारताला स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!