व्हायरसच्या धोक्यामुळे नाशिकमधील एटीएम राहणार बंद

0

नाशिक, दि. १५ : सध्या भारतासह जगातील अनेक देशांमध्ये रॅमसमवेअर या व्हायरसने हल्ला चढविला असून त्यातून बँकींग प्रणाली, शेअर बाजारही सुटू शकलेले नाही.

परिणामी या संदर्भातील पुढील धोका टाळण्यासाठी देशभरातील एटीएमचे सॉफ्टवेअर अपटेड करण्याच्या सूचना आज रिझर्व बँकेने दिल्या आहेत.

त्यामुळे आज नाशिक शहरासह देशातील बहुतेक एटीएम केंद्र काही काळासाठी बंद राहणार आहे.

परिणामी गेल्या आठवडाभरापासून चलनटंचाई सोसणाऱ्या नाशिककरांना आजही एटीएममधून पैसे मिळू शकणार नाहीत, अशी चिन्हे आहेत.

ब्रिटनसह अनेक मोठ्या देशांमधील दोन लाखांहून जास्त संगणक (विंडोज प्रणाली) या रॅमसमवेअर व्हायरसमुळे बाधित झाले आहेत.

भारतातही त्याचा धोका असून रिझर्व बँकेने खबरदारीचा उपाय म्हणून एटीएमची संगणक प्रणाली अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

*