Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रयाण; भाविकांना रेनकोट वाटप

Share

त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे हरिनामाच्या गजरात, संत निृत्तीनाथांसह माऊलींच नाम घोष आणि भक्ती रसात तल्लीन होऊन विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपुरच्या दिशेने रवाना झाली. यावेळी रजत रथासह टाळ, मृदुंग, गजर,भजन, अभंगाचा सुर, वारकरी महिला-पुरुष, भाविक, कीर्तनकार, दिंडीकरी, विणेकरी, भालदार, चोपदार आदी या पालखीत सामील झाले होते.

पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी आज सकाळी ११ वाजता विठ्ठल नामाच्या गजरात, उत्साही वातावरणात त्र्यंबकेश्वर नगरी सजली फुलली होती. यावेळी दहा हजार भाविक दिंडीसोबत मार्गस्थ झाले. ग्रामस्थांनी पालखी सोबत नाक्यापर्यंत निवृत्तीराय पांडुरंगा येथूनच तुझे दर्शन घेतो याची प्रचिती देत पालखीला प्रेमभावे निरोप दिला.

दरम्यान वारकऱ्यांना पुढील प्रवासात पावसापासूनबचाव करण्यासाठी शासनाने यंदा बाराशे रेनकोटचे वाटप केले. संत निवृत्तीनाथ मंदिरात विधिवत रजत रथाची महापूजा करण्यात आली. यावेळी रथाला माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे यांची बैल जोडी होती.

यावेळी सचिव ओ एस श्रीकांत भारती याची विशेष उपस्थिती होती. आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर, देहूकर महाराज, डॉ धनश्री हरिदास त्रिवेणी सोनवणे तसेच नगरसेवक वर्ग व मान्यवर यांची उपस्थित होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!