Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : शिर्डी महामार्गावर तिहेरी अपघात; देवळाली कॅम्प येथील लष्करी जवानाचा मृत्यू

Share
सिन्नर |  वार्ताहर
सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर खोपडी शिवारात वडांगळी फाट्यावर आज (दि.3) सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मारुती स्विफ्ट कार, क्रुझर जीप व छोटा हत्ती यांच्या तिहेरी अपघात देवळाली कॅम्प येते कार्यरत लष्करी जवानांचा मृत्यू झाला.
या अपघातात स्विफ्ट कार व क्रूजर मधील प्रवासी जखमी झाले असून सर्वांना उपचारासाठी नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील जवान केरळ राज्यातील असून नाशिक येथील आर्टिलरी सेंटरमध्ये कार्यरत असल्याचे समजते. दातली ओलांडल्यावर पुढे असणाऱ्या वडांगळी फाट्यावर ही कार शिर्डीकडून येणाऱ्या क्रुझर जीपवर धडकली.
या जीपच्या पुढे छोटा हत्ती मालवाहतूक वाहन सिन्नरच्या दिशेने जात होते. समोरून भरधाव येणाऱ्या स्विफ्ट कारची धडक वाचण्यासाठी त्यांनी छोटा हत्ती रस्त्याच्या कडेला घेतला. मात्र तो अनियंत्रित झाल्याने तो उलटून त्यात चालक किरकोळ जखमी झाले.
या घटनेत स्विफ्ट कार चालक लष्करी जवान रेड्डी यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. अपघात झाल्यावर परिसरातील व्यावसायिक व रहिवाशांनी धाव घेत सर्व जखमींना उपचारासाठी हलवले.
अपघाताची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ताफ्यासह दाखल झाले. अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी नाशिकला नेण्यात आले आहे. स्विफ्ट कार मधून रेड्डी यांच्यासोबत एक महिला व तीन मुले प्रवास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले ते सर्वजण जखमी झाले आहेत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!