Photogallery : चाहूल गणराया तुझ्या आगमनाची; बाजारपेठा सज्ज

0

नाशिक : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशत्सवाची जोरदार तयारी झाली असून शहरात थिठिकाणी गणेशमूर्तीची दुकाने थाटली आहेत.त्यामुळे गणेशउत्सवाच्या तयारीला उधाण आले आहे.

शहरातील मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा या परिसरात वेगवेगळ्या प्रकारात गणेश मूर्ती दिसत आहेत. यंदा, गणपतीचे नवनवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. यामध्ये बालरुपातील गणपती, माऊली गणपती, महंत गणेश, सावकार बैठक गणेश, फेटा गणपती, ब्राह्मण बैठक, उंदीरवाहक मूर्ती या प्रकारचे गणपतीचे नवीन ट्रेंड्स बाजारात उपलब्ध आहेत.

गणपती मूर्तींवर कुठल्याही प्रकारचा कर आकारला जात नसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी गणपतीच्या दरात कुठल्याही प्रकारची घट झालेली दिसत नाही.

गणेश मूर्तींचे दर सरासरी अर्धा फूट ५०० रू, दीड फूट १५०० ते २१००रू, दोन फूट ३१०० रू, तीन फूट ६००० रू, पाच फूट १२००० रू या दराने बाजारात विक्री करण्यासाठी उपलब्ध आहेत.

गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत. दररोज १० ते १२ मूर्तींची विक्री होत असते. – गिरीश येवले 

मूर्ती घडवण्याच्या क्षेत्रात तिसरी पिढी आहे. ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीच्या गणेश मूर्ती घडविण्याचे काम करतात. त्यांच्या कडे मूर्ती घेण्यासाठी दरवर्षी विदेशी पाहुणे येतात व मूर्ती घेतात. त्यांनी घडविलेल्या मूर्ती अमेरिका व जर्मनी मध्ये विकण्यासाठी मागवल्या जातात. -संदेश मोरे 

शिवराम मोरे मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाने एक विशिष्ट प्रकारची पावडर विक्रेत्यांना दिली आहे, ती ग्राहकांना गणेश मूर्ती बरोबर देण्यात येते ज्यामुळे पीओपीच्या मूर्ती घरीच शाडू मातीच्या मुर्तींप्रमाणे विसर्जित करता येतील.

संकलन : अनिरुद्ध जोशी, पूजा ठुबे, मोहन कानकाटे, गौतम जगताप

LEAVE A REPLY

*