Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अटकसत्र

Share

नाशिक : भाजपची महाजनादेश यात्रा काल प्रचंड शक्तिप्रदर्शनानंतर पार पडल्यानंतर आज साधग्राम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा काही ठिकाणी पोलीसांनी या नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे.

दरम्यान काल (दि. १८) रोजी मनश्या काही कार्यकर्त्यांनी महाजनादेश यात्रेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. त्यामुळे आजच्या सभेला कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी शहरातून विविध ठिकाणाहून विरोधकांना ताब्यात घेतले आहे. सत्ताधारी भाजपने सत्तेचा वापर करून पोलिसांच्या माध्यमातून अटक करत लोकशाहीची गळचेपी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

विद्यार्थीच्या मागण्या पूर्ण करणारे फलक दाखवविल्याने काल छात्रभारतीच्या काही सदस्यांना ताक करण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा सभेच्या पार्श्वभूमीवर राज्यसदस्य समाधान बागुल, तसेच नांदगाव येथील आपचे नांदगाव तालुका अध्यक्ष विशाल वडघुले यांना पोलिस प्रशासनाकडुन अटक करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!