Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी तालुक्यासाठी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाला मंजुरी

Share

इगतपुरी । प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यासाठी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाला मंजुरीसाठी उच्च न्यायालयाने या बाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देत इगतपुरी तालुका न्यायालयाला जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांच्या आदेशाने जिल्हा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश गीमेकर यांनी दि. १२ एप्रिल रोजी इगतपुरी तालुक्यातील न्यायालयाला दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोर्ट मंजुरीचे पत्र वकील संघाचे अध्यक्ष अँड. रतनकुमार इचम त्यांचे सहकारी वकील संघाला सुपुर्द केले.

गेली तीन वर्षापासुन इगतपुरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड. रतनकुमार इचम व वकील संघाने इगतपुरी तालुक्याला वरिष्ठ स्तर दिवानी न्यायालय मंजुरी मिळावी या बाबत प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे.

इगतपुरी तालुक्यातील जनता, पक्षकार व वकीलांना एक कोटीच्या कोर्ट कामाच्या खटल्यासाठी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात जावे लागत होते. आता जिल्हा न्यायालयात चालणारे कोटी अर्थ व्यव्यस्था खटले व शासकीय खटले तालुक्यात चालविले जातील. यामुळे सर्व सामान्य नागरिकांसह वकील यांना न्यायालयीन कामाची दगदग व नाहक होणारा खर्च, मानसिक व शारीरिक त्रास कमी होवुन न्यायीक बाजु मांडतांना तणाव मुक्त रहाता येणार असल्याचे माहीती वकील संघाचे अध्यक्ष अँड. रतनकुमार इचम यांनी दिली.

इगतपुरी न्यायालयात वरिष्ठ सत्र न्यायालय मंजूरीचे पत्र स्विकारतांना ते बोलत होते. या निर्णयामुळे तालुक्यातील अनेक सर्वसामान्य जनतेने उच्चन्यायालय, जिल्हा वरिष्ठ न्यायाधीश तसेच इगतपुरी वकील संघाचे अध्यक्ष अँड. रतनकुमार इचम व सर्व वकील संघाचे अभिनंदन केले.

तालुक्यातील धरणग्रस्त, शेतकरी, कष्ठकरी, व्यापारी आदींसह सर्व सामान्य जनतेला न्याय मिळुन देण्याकामी नवीन कायदा, तरतुदी व होणारे बदल या करीता इगतपुरी न्यायालयातील सभागृहात वकील संघाचे वरिष्ठ पातळीवर अभ्यास मार्गदर्शन पर व्याख्यान आणि विधी तज्ञ माहिती बाबत कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी वकील बार असोचे अध्यक्ष अँड, रतनकुमार इचम, अँड. युवराज जाधव, बाळासाहेब वाजे, जितेंद्र शिंदे, डी. बी. खातळे, डी. एस. खातळे, नंदकुमार वालझाडे, यशवंत कडु, इश्वरसिंग परदेशी,

एन. पी. चव्हाण, सुर्यभान सहाने, विजय कर्नावट, निलेश चांदवङकर, अकबर शेख, अँड. मेमन, आर. जी. वाजे, वंजतीमाला वाजे, संजय जगताप, सुशिल गायकर, पंढरी गायकर, जयदेव रिके, ओमप्रकाश भरिंङवाल, रोहित उगले, इरफान पठाण, नदीम शेख, भारत कोकणे, कातोरे, सुनिल कोरडे, सुनिल काळे, प्रीती चांडक, बाळासाहेब लहाने, तोकडे, संपत जाधव, अँड. सौ जाधव, संध्या भडांगे, शबाना मेमन, कोरडे आदी वकील व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!