Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘आपले सरकार’वर नाशिककरांंनी दाखल केले 20 लाख अर्ज

Share

नाशिक । भारत पगारे

राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या आपले सरकार सेवा केंद्र आणि पोर्टलवर नाशिककरांनी सन 2015 ते 18 या तीन वर्षात 20 लाख 36 हजार 411 अर्ज दाखल केले आहेत. त्यातील 19 लाख 87 हजार 392 अर्जांवर कार्यवाही झाली असून लोकसेवेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसते.

राज्य लोकसेवा हक्क आयोगाने कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या कायद्याखाली 31 मार्च 2018 पर्यंत 492 सेवा सुरू करण्यात आल्या. त्यापैकी 406 सेवा या ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे. आपले सरकार पोर्टल व आरटीएस मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर सेवा दिल्या जातात.

राज्यात 26 हजार पेक्षा जास्त आपले सरकार केंद्र असून मागील तीन वर्षात 31 विभागातून 4 कोटी 58 लाख 26 हजार 987 अर्ज ऑनलाइन दाखल करण्यात आले आहेत. तसेच ऑफलाइन अर्ज देखील आले आहेत. 4 कोटी 49 लाख 84 हजार अर्जांपैकी 4 कोटी 47 लाख 40 हजार 495 अर्ज मंजूर करण्यात आले आहे.

वरील अर्जातील 2 लाख 44 हजार 455 अर्ज नामंजूरही करण्यात आले आहे. सर्वात जास्त अर्ज हे महसूल, त्यापाठोपाठ कामगार व गृह विभागाशी निगडीत आहेत. विविध विभागांनी कार्यवाही केलेल्या अर्जांपैकी 63 टक्के अर्जांवर विहित कालावधित कार्यवाही झाली आहे. दरम्यान, एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातून सुमारे 82 लाख 26 हजार 94 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील 82 लाख 1 हजार 759 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्या खालोखाल अमरावती व पुणे जिल्हा अर्ज करण्यात आघाडीवर आहे.

वर्षनिहाय मंजूर व नामंजूर अर्जांची संख्या

सन मंजूर नामंजूर
2015-16 66, 39 , 413 30, 038
2016-17 1, 85, 55, 310 79, 247
2017-18 1, 95, 45, 772 1, 35, 170

आदिवासी विभागाचा अर्जच नाही
कोट्यवधींच्या संख्येने आलेल्या या अर्जांमध्ये आदिवासी विकास विभागाचा एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे हा विभाग पारदर्शी व हायटेक झाला आहे का अशी चर्चा सुरू आहे.

2 लाख आधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘यशदा’ या संस्थेने तीन वर्षात 2 लाख 24 हजार 130 आधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षित केले आहे.

विविध माध्यमांद्वारे प्राप्त अर्जांची संख्या

आपले सरकार सेवा केंद्र-व्हीएलई- 3 कोटी 30 लाख 64 हजार

आपले सरकार सेवा केंद्र- सेतू- 1 कोटी 90 हजार 555

आपले सरकार पोर्टल- 25 लाख 28 हजार 927

आपले सरकार सेवा केंद्र- ग्रा. प.- 1 लाख 42 हजार 675

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!