Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : पूरग्रस्तांंसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस मदतीचे आवाहन

Share

नाशिक । प्रतिनिधी
महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपले असून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये महापुराची आपत्ती ओढावली आहे. कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. पूरग्रस्तांंसाठी शासनाकडून बचाव कार्य सुरू असून युद्धपातळीवर मदत कार्य राबवले जात आहे. या पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांंढरे यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी दानशूरांनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा करावी, असे आवाहन केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा, पंचगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कर्नाटकने अलमट्टी धरणातून विसर्ग करण्यास विलंब केल्याने सांंगली व कोल्हापूरात महापूर आला. अनेक गावे पाण्यात बुडाली असून शेकडो गावांना पुराचा वेढा पडला आहे. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली.

पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यभरातील संस्था, दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संस्था, देवस्थाने व ट्रस्ट पुढे येत आहे. पूरग्रस्तांना अन्नाचे पाकिटे, शुद्ध पाणी, कपडे, औषधे व इतर मदत केली जात आहे. सर्व स्तरातून मदतीचा ओघ होत आहे. मात्र, पूरपरिस्थिती ही गंभीर असून मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.

शासनाने पूरग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी हे खाते उघडण्यात आले असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (10972433751), खाते क्रमांकावर आयएफएससी कोड (एसबीआयएन 00003000) थेट मदत जमा केली जाऊ शकते.

सांगली, कोल्हापूर येथील पूरपरिस्थिती गंभीर असून हजारो नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, समाजसेवी संस्था, देवस्थाने यांंसह इच्छुकांनी संकटग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घ्यावा.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!