नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पिंगळेंचा राजीनामा

0

नाशिक । दि. 1 प्रतिनिधी
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी विशेष सभेचे आयोजन करून अविश्वास ठराव आणण्याच्या अगोदरच सभापती देविदास पिंगळे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा सादर करून, सभापती पदाचा त्याग केला आहे. त्यामूळे बाजार समितीच्या नव्या सभापतीची निवड होणार आहे.

बाजार समितीच्या 15 संचालकांनी सभापती देवीदास पिंगळे यांच्या वादग्रस्त कार्यकीर्दीचे उदाहरण देत बाजार समिती बदनाम होत असल्याचे म्हणत, शेतकरी हिताला बाध पोहोचत असल्याचे म्हटले होते. पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी विशेष सभेची मागणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे संचालकांनी केली होती.

विशेष सभेला जिल्हाधिकार्‍यांनी हिरवा कंदील दाखवल्याने येत्या चार जुलैला विशेष सभा होणार होती. त्या अगोदरच पिंगळे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सभापतीपदाचा राजीनामा सादर करून, पदावूर आपण दूर होत असल्याचे म्हटले आहे.

पिंगळे यांना न्यायालयाने प्रतिबंध केलेला असल्याने त्यांनी राजीनाम्याची प्रत दिलीप थेटे यांच्या हस्ते जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांना सादर केली. यावेळी थेटे यांच्यासह विनायक माळेकर आदी उपस्थिती होते. न्यायालयीन बाबीमुळे आपल्याला बाजार समितीचे कामकाज पाहणे शक्य होत नसल्याने सभापती पदाचा राजीनामा देत असल्याचे पिंगळे यांनी पत्रात म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात बाजार समितीच्या 15 संचालकानी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांना पत्र दिले होते. त्यात सभापती पिंगळेंवर अविश्वास ठराव आणण्यसाठी विशेष सभेची परवानगी मागण्यात आली होती. बाजार समिती पिंगळेंच्या वादग्रस्त कार्यकीर्दीमुळे आणि समिती बदनामी होत असल्याचे त्यात म्हणत सभापतींना हटवण्यासाठी अविश्वास ठराव आणण्याची तयारी या संचालकांनी केली होती.

LEAVE A REPLY

*