Type to search

Breaking News टेक्नोदूत मुख्य बातम्या

सावधान ! तुमच्या मोबाईलला ‘जूडी मालवेअर’ चा धोका तर नाही ना?

Share

नाशिक : जगभरात यूजर फ्रेंडली ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या अँड्रॉइड मोबाईल युसर्सचे प्रमाण अधिक आहे . अँड्रॉइडला पूरक ठरणारी सॉफ्टवेअर अॅप्स मोफत उपलब्ध असतात. म्हणूनच आता अटँकर्स अँड्रॉइड डिव्हाईसला लक्ष केले आहे. त्यामुळे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांनी दक्षता घ्यायला हवी.

सध्या `जूडी’ या मालवेअरचा धोका अँड्रॉईड यूजर्ससाठी निर्माण झालेला आहे. चेक पॉईंटच्या ब्लॉगपोस्टनुसार जूडी व्हायसर हे ऑटो क्‍लिकिंग ऍडवेअर आहे. जे साउथ कोरियाच्या एका कंपनीने तयार केले असून ज्याचे नाव किनिविनि आहे.

हे अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी तयार करण्यात आले आहे. जूडी मालवेअरचे काम फॉल्स क्लिक गोळा करुन त्या माध्यमातून व्हायरस तयार करणारी लोकं पैसा कमवतात.

आतापर्यंत गुगल प्ले स्टोअरमध्ये 41 ऍपमध्ये ज्यूडी मालवेअर सापडला आहे. हा व्हायरस असलेला एखादा ऍप तुम्ही डाऊनलोड केला तर तुमच्या डिव्हाइस कमांड सर्व्हरवर हा व्हायरस ताबा घेतो. त्यामुळे चुकीच्या लिंक आणि ऍडवर क्‍लिक होणे सुरु होते.प्रत्येक क्लिकच्या मोबदल्यात मालवेअर डेव्हलपर्सना पैसे मिळतात. अशीच मालवेअर डेव्हलपरची कमाई होते.चेक पॉईंट सिक्युरिटी रिसर्च फर्मनुसार या मालवेअरमुळे जवळजवळ 3.6 कोटी यूजर्स प्रभावित झाले आहेत.

या मालवेअरची गंभीरता पाहून गुगलने आपल्या प्ले स्टोअरमध्ये मालवेअर सापडलेले संबंधित ऍप हटवले आहेत. हे व्हायसर असलेली ऍप्स जवळजवळ 40 लाख ते 1.8 कोटी लोकांनी डाऊनलोड केले आहेत. त्यामुळे याच्या धोक्याची शक्‍यता वर्तवण्यात आलेली आहे. गुगलने अँड्रॉईडमधून बॅग शोधणाऱ्यांनी बक्षिस म्हणून २ लाख डॉलर रक्कम देण्याचे ठरविले आहे. गुगलने आपल्या प्ले स्टोअरमध्ये मालवेअर सापडलेले संबंधित ऍप हटवले आहे

मालवेअरच्या अटॅकपासून वाचण्यासाठी अँटी व्हायरस कंपन्यांची मालवेअर अटॅक टाळण्यासाठी सॉफ्टवेअरही बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, अशा सॉफ्टवेअरनाही हे अटॅक चकविण्यात अपयश येत आहे.

जास्त धोका कुणाला
गूगलने अनेक वर्षांपूर्वी विकसित केलेलेल्या सिस्टीमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वेबसाइट एक्सट्रीमटेक डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, मोबाईलमध्ये मालवेयर आणि संरक्षणाचं उल्लंघनांच्या घटना जुन्या ओएस असणाऱ्या फोनमध्ये आढळलेल्या आहेत. नवीन अँड्रॉईड व्हर्जनचे मोबाईल सुरक्षित आहेत. त्यामुळे गूगलने नव्या अँड्रायडमध्ये कोणताही बग शोधणाऱ्या व्यक्तीला २ लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केलं आहे.

जूडी’ मालवेअरचा त्रास
डिव्हासमध्ये स्वयंचलितपणे जाहिराती प्ले, प्रदर्शित करणे, वारंवार जाहिराती पॉपअप करून त्या क्लिक करायला मोबाईल वापरकर्त्याला भाग पाडून त्याच्या कामात अडथळे निर्माण करण्याचे काम जूडी’ मालवेअर करतो.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!