Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

..अन् पक्षीप्रेमींच्या दक्षतेमुळे फ्लेमिंगोला मिळाले जीवदान

Share

नाशिक । प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील एका शेतात विजेच्या ताराला स्पर्श झालेल्या जखमी फ्लेमिंगोला नागरिकांच्या मदतीमुळे आणि पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपचारांनी वाचवण्यात यश आले.

मातेरेवाडीतील वाळु कोंबडे यांना शेतात काम करत असताना प्रचंड आवाज आला. त्या ठिकाणी उच्च दाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्यामुळे दोन फ्लेमिंगो जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांना आढळले. तत्काळ त्यांनी पक्षीतसेच सर्पमित्र दीपक धोमडे यांना ही बाब कळवली. जखमी फ्लेमिंगोच्या जोडीबद्दल मातोरेवाडीतील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय दुगजे यांना माहिती देण्यात आली.

दोन्ही पक्ष्यांना लगेच पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. मात्र पैकी एकाच उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाचलेला फ्लेमिंगो उंचावर पडल्यामुळे त्याच्या पाय मोडला होता. जखमी फ्लेमिंगोवच्या पायावर डॉ. दुगजे यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. संदिप पवार यांच्या सहकार्याने शस्त्रक्रिया करुन सळई टाकून प्लॅस्टर केले.

कोंबडे, धोमडे या पक्षीप्रेमींनी पक्ष्याबद्दल भूतदया दाखवून तत्काळ उचलेले पाऊल आणि डॉ. दुगजे, डॉ. पवार यांनी जखमी पक्ष्यांवर केेलेल्या उपचारामुळे दोनपैकी एका पक्ष्याला जीवदान मिळाले. याबद्दल पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होत आहे.

इको फाऊंडेशनचा पुढाकार
नाशिक येथील गंगापूर रोडवरील सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये जखमी फ्लेमिंगोला पूढील उपचारासाठी हलवण्यात आले. त्याला पक्षांत बळ आल्यावर आणि पाय बरा झाल्यानंतर मूळ पाणथळ जागी सोडून देण्यात आहे. दरम्यान, नाशिकच्या एको-इको फाऊंडेशने जखमी रोहीत पक्ष्यांची सुश्रृषा आणि संगोपणाची जवाबदार स्वीकारली आहे. संस्थेचे अरुण अय्यर, देविका भागवत आणि राहुल कुलकर्णी यांनी यासाठी प्रयत्नशील आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!