Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक-निफाड संपर्क तुटला; पिंपळगाव बसवंत मार्गे निफाड पर्यायी मार्ग

Share

नाशिक | प्रतिनिधी

गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर चांदोरी चौफुलीवर महामार्गावर गुद्घ्यापेक्षाही अधिक पाणी साचले होते. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तरी निफाड, येवला, लासलगाव मार्गे औरंगाबाद जाणाऱ्या वाहनधारकांना पिंपळगाव बसवंत मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करता येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

महामार्गावर पाणी आल्यामळे नाशिक जाणारी वाहतुक आणि नाशिकहुन निफाडकडे येणारी वाहतुक पूर्णपणे बंद झाली आहे. निफाडहुन-नाशिक आणि नाशिकहुन – निफाड येणाऱ्या जाणाऱ्यांनी पिंपळगाव बसवंत या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यासोबतच नाशिक जांनोरी मोहाडी पिंपळगाव या मार्गात जानोरी येथे बाणगंगा नदीवर पुलावर पाणी आहे. तसेच दिंडोरी मार्गे दिंडोरी पिंपळगाव संपर्क तुटला आहे अशीही माहिती मिळते आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!