भाडेकरू म्हणून राहणाऱ्या 3 दरोडेखोरांना पाथर्डी फाटा येथून अटक

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी) – पाथर्डी फाटा येथून आज सकाळी तीन दरोडेखोर पोलिसांनी ताब्यात घेतले.

इंदिरानगर आणि अहमदनगर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

 

पाथर्डी फाटा येथील पार्वती इमारतीतीत 3 दिवसांपासून ते भाडेकरू म्हणून राहत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 भरलेली पिस्तुले, 40 जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल जप्त केले. तिघेही नगर जिल्ह्यातील आहेत.

आज पहाटे 5 पासून 3 तास ही कारवाई चालली, स्वतः पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी घटनास्थळी भेट दिली.

सरुवातीला हे तिघेही अतिरेकी असल्याचा संशय व्यक्त होत होता.

 

LEAVE A REPLY

*