Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नारळाच्या शेंडीची मुसंडी आता अँमेझॉनवर

Share

नाशिक : कधी, कुठे काय विकायला येईल सांगता येत नाही. सध्या सणांचा आठवडा चालू असल्याने लोकांना आकर्षित करण्यासाठी शॉपिंग वेबसाईट लहानांपासून ते मोठ्यात मोठ्या वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी काढतात. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर अँमेझॉनवर मोठ्याप्रमाणावर सेलचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान या शॉपिंग वेबसाईटवर अगदी बारीक सारीक वस्तू देखील मिळतात. आता या वेबसाईट वर भांडे घासण्यासाठी स्क्रब म्हणून नारळाची घासणी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. खरं तर सर्वसामान्य कुटुंबात या घासणीचा उपयोग पाहावयास मिळतो आणि हेच शॉपिंग वेबसाईटने हेरून अजबच शक्कल लढवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्यांना याची माहिती झाली असेल ते अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान आता नारळाच्या घासणीची किंमतही ४९ रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत आहे. तसेच किंमतीतही सूट देण्यात आली आहे. सेंद्रिय आणि नैसर्गिक वस्तूंचा वापर वाढीस लागावा यासाठी ही वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. घरामध्ये उपलब्ध असलेल्या नारळाचा वापर करून स्क्रब तयार करण्यात येत आहे. त्यामुळे आता कधी काय विकायला येईल सांगता येणार नाही.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!