Type to search

क्रीडा

अजिंक्य राहणे दिल्ली कॅपिटल्स कडून खेळणार

Share

मुंबई : आयपीएलचा १३ व्या हंगामाचा लिलाव १९ डिसेंबरला कोलकात्यात होणार आहे. काल गुरुवारी १४ नोव्हेंबरला ट्रेडिंग प्रक्रिया पूर्ण झाली असून,आता आठही संघांच्या मालकांनी ट्रेंड ट्रान्सफर प्रक्रियेद्वारे खेळाडूंची अदला बदल करायला सुरुवात केली आहे.

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आता पुढील हंगामात दिल्ली कॅपिटल्स कडून खेळणार आहे. अजिंक्य रहाणेने आतापर्यंत राजस्थान रॉयल्स, पुणे वॉरियर्स इंडिया,मुंबई इंडियन्स, राईझींग पुणे सुपरजाईट्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

रहाणे राजस्थान रॉयल्स कडून ८ वषे करारबद्ध होता रहाणेच्या बदल्यात दिल्ली संघाने राहुल तेवटियाला राजस्थान रॉयल्सकडे दिले आहे. रहाणेने राजस्थान संघाकडून खेळताना २८१० धावा काढल्या आहेत. राहणेकडे १०० आयपीएल लढतीचा अनुभव असून, त्याने २४ सामन्यांमध्ये राजस्थानचे नेतृत्व केले आहे दोन दिवसांपूर्वीच रहाणेने आपल्याला मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये पुनरागमन करायचे असल्याचे स्पषट केले आहे.

२०११ हंगामात तो मुंबई इंडिन्सकडून राजस्थान रॉयल्स संघाशी काराबद्ध झाला. त्याने सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून आपला नावलौकिक मिळवला २०१९ च्या हंगामात अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीवह स्मिथकडे सोपवले होते. रहाणेने मागील हंगामात १४ लढतींमध्ये एकूण ३९३ धावा काढल्या होत्या. त्याची सरासरी ३२. ७५ इतकी होती यामध्ये नाबाद १०५ या खेळीचाही समावेश होता.

रहाणेने भारताकडून २०१६ मध्ये अखेरचा टी २० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता दिल्ली कॅपिटल्सकडे शिखर धवन , श्रेयस अय्यर रिषभ पंत असे आघाडीचे तीन फलंदाज आहेत.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!