Type to search

Video : अंशकालीन स्त्री परिचर संघटनेचे मानधनासाठी आंदोलन

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : अंशकालीन स्त्री परिचर संघटनेचे मानधनासाठी आंदोलन

Share

नाशिक । प्रतिनिधी
आरोग्य विभागातील स्त्री परिचरांना तीन हजार रुपये मानधन देण्याबाबतचा निर्णय झाला असून, त्यास मान्यताही मिळालेली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आरोग्य विभागातील अंशकालीन स्त्री परिचर संघटनेनी मंगळवारी (दि.11) आंदोलन केले. जिल्हा परिषदसमोर घोषणा देत सामान्य प्रशासन विभागाला निवेदन देण्यात आले.

आरोग्य विभागात कार्यरत अंशकालीन स्त्री परिचरांना दरमहा बाराशे रुपये मानधन देण्यात येते. यात बदल करून शासनाने 16 एप्रिल 2019 पासून तीन हजार रुपये देण्याचे मान्य केले. सुधारित मानधन 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आले आहे. या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी न झाल्यामुळे परिचरांवर अन्याय होत आहे.

या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, यासाठी संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजू देसले, जिल्हाध्यक्षा चित्रा जगताप, हसीना शेख, विजय दराडे, राजू निकम, शालिनी बागुल, सुमन राजगुरु, अरुणा संगमनेरे, तुळसाबाई निकम आदी उपस्थित होते.
.

संघटनेच्या मागण्या
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील परिचरांना आरोग्य सेवेत सामावून घ्यावे.किमान वेतन 18 हजार रुपये द्यावे.अंशकालीन स्त्री परिचरांच्या सर्व रिक्त जागा भराव्यात.परिचरांच्या वारसांना रिक्त पदावर नेमणूक मिळावी. रजा, सुट्यांच्या लाभ द्यावा आणि प्रवासभत्ता द्यावा.आरोग्य विभागाने अंशकालीन स्त्री परिचरांना दहा हजार देण्याची शिफारस करावी. थकीत मानधन त्वरित मिळाव्या, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!