Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक विमानतळ : नाईट लॅण्डिगचा प्रश्न निकाली; इंडिगोने घेतले प्रात्यक्षिक

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या विमानसेवेत मोठे पाऊल समजले जाणारे ‘नाईट लॅण्डिंग’चा प्रस्ताव अंतिम टप्पात आला असून, येत्या 8 दिवसांत इंडीगोच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार असल्याने नाशिकचा बहुप्रलंबीत ‘नाईट लॅण्डिंग’ च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सेवेशी जोडण्याचा प्रश्न लवकरच प्रशस्त होणार आहे.

मुंबईच्या जवळचे विमानतळ म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिकचे विमानतळ ‘नाईट लॅण्डिंग’ साठी चर्चेत होते. मध्ंयंतरी शिर्डीच्या विमानतळाला मंजूरी मिळाल्याचे वृत्त चर्चीले जात होते. प्रत्यक्षात नाईट लॅण्डींग साठी विमान कंपनीच्या माध्यमातून नवख्या पायलटच्या माध्यमातून दहा वेळा रात्रीच्या वेळी विमान लॅण्डिंग व पून्हा टेक ऑफ करण्याचे प्रात्यक्षिक द्यावे लागते. या माध्यमातून विमानसेवेसाठी ते सक्षम असण्याची खात्री गृहीत धरली जाते.

इंडीगो कंपनीने या बद्दलचा सराव प्रात्यक्षिक केलेले आहे. त्यासंदर्भातील रिपोर्ट डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिगेशन (डीजीसीए) यांना द्यावयाचा असतो. इंडीगो कंपनीचे असोसिएट डायरेक्टर सूरेंद्रसिंग नारली हे दौर्‍यावर असल्याने ती प्रक्रिया लांबलेली आहे. त्यांच्या आगमनानंतर इंडीगो चा अहवाल सादर केला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यानंतर डीजीसीएची त्यास मंजूरी मिळणार आहे.

या विमानतळावर इंडीगोच्या साईजेट गोवा, हैद्राबाद व कार्गो विमान नाईट लॅण्डिंग करणार आहेत. त्यांच्या जाण्यायेण्यातून नाशिककरांना मुंबईसाठी विमानसेवा उपलब्ध राहणार असलयाने लगतच्या काळात नाशिकच्या प्रवाश्यांना मुंबईच्या आंतरराष्ट्रीय सेवांशी थेड जोडले जाणार असल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वाजावरण आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!