Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक-पुणे विमानसेवा : तिकीट विमान प्रवासाचे अन् प्रवास इनोव्हा कारने

Share

नाशिक : पुणे विमानतळावर नोटम जारी करण्यात आल्याने एलायन्स एअरने शनिवारी नाशिक-पुणे मार्गावरील उड्डाण रद्द केले. यामुळे प्रवाशांना बायरोडने नाशिक प्रवास करावा लागला.

गेल्या काही दिवसांपासून उडान योजनेंतर्गत नाशिक पुणे विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. दरम्यान एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे नाशिकमध्ये अहमदाबाद, पुणे, हैदराबाद अशी विमानसेवा सुरू आहे. हे विमान हैदराबादहून नाशिकमार्गे पुण्याला जात होते.

शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता पुणे विमानतळावर उतरणार होते. परंतु पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू असल्यामुळे तेथे सकाळी विमान सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे हे विमान नाशिक येथेच थांबविण्यात आले. परिणामी पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांना कारने पुणे गाठावे लागले.

दरम्यान यासंदर्भातील माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. त्यामुळे पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी नाशिक विमानतळावर इनोव्हा कार स्वागतासाठी उभा होत्या. त्यानंतर हे सर्व प्रवासी इनोव्हातून बायरोड पुणे येथे गेले. त्याचा सर्व खर्चही अलायन्स एअरने केला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!