Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

19 ऑक्टोंबरपासून गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा

Share

नाशिक । प्रतिनिधी
एअर अलायन्सनंतर नाशिक – गोवा व नाशिक – हैदराबाद या हवाई मार्गासाठी स्पाईस जेट विमानसेवा देणार आहे. 19 ऑक्टोंबरपासून या दोन शहरांसाठी ओझर येथून विमान टेकऑफ घेईल. या नवीन सेवेमुळे नाशिकची एअर कनेक्टिव्हीटी अधिक बळकट होणार आहे.

नाशिक विमानतळावरुन सध्या हैदराबाद व अहमदाबाद या दोन शहरांसाठी उड्डाण सुरु आहे. एअर इंडियाच्या एअर एलायन्स या कंपनीकडून ही सेवा सुरु आहे. जेट एअरवेज विमान कंपनीकडून दिल्लीसाठी विमानसेवा दिली जात होती. मात्र, जेट एअरवेज दिवाळखोरीत निघाल्याने दिल्लीसाठीची विमानसेवा एप्रिल महिन्यापासून बंद आहे.

त्यासाठी एअर इंडिया पुढाकार घेत असून दिल्लीसाठी जेट एअरवेजचे टाईम स्लॉट त्यांनी घेतले आहे. स्पाईस जेट गोवा व हैदराबाद या दोन शहरांसाठी येत्या 19 ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरु करणार आहे. ओझर विमानतळावरुन विमान टेकऑफ घेणार असल्याने नाशिककरांना या दोन शहरात विमानाने जाण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

नाशिकहून मोठ्या संख्येने पर्यटक गोव्याला रेल्वे, खासगी वाहनाने जात असतात. विमानसेवा सुरु होणार असल्याने त्याना विमानाने गोव्याला जाता येईल.अनेक उदयोजक, व्यावसायिक कामानिमित्त हैदराबादला ये जा करतात. या नव्या विमानसेवेमुळे त्यांना देखील फायदा होणार आहे.

तसेच,नाशिक विमानतळावर रात्रीच्यावेळी नाईट लॅण्डींगचा मार्ग आधिच मोकळा झाला आहे. चार्टड विमान देखील ओझर विमानतळावर ये जा करु शकते. त्यामुळे नाशिकच्या हवाई सेवा विस्तारण्याचा मार्ग अधिक खुला होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!