Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक-अहमदाबादसाठी होणार येत्या सोमवारी ‘उड्डाण’; हैद्राबाद विमानसेवेची अद्याप प्रतीक्षा

नाशिक-अहमदाबादसाठी होणार येत्या सोमवारी ‘उड्डाण’; हैद्राबाद विमानसेवेची अद्याप प्रतीक्षा

नाशिक | प्रतिनिधी 

ओझर येथील नाशिक विमानतळावरून लवकरच हवाई सेवेला प्रारंभ होणार आहे. सूरूवातीला नाशिक-अहमदाबाद ही सेवा येत्या सोमवारपासून तब्बल दोन महिन्यांनतर पूर्ववत होणार आहे. तर हैद्राबाद सेवेला अद्याप सिव्हील एव्हिएशनकडून परवानगी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या सेवेबाबत अद्याप कुठलीही माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

- Advertisement -

येत्या सोमवारपासून सूरू होणारी ही सेवा टूजेट कंपनीकडून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत या सेवेला प्रारंभ होत आहे. नाशिक पुणे, नाशिक-हैद्राबाद सेवेच्या बाबत माहिती देण्यात आलेली नसली तरीदेखील नाशिकहून अहमदाबादला उड्डाण होणार असल्याने दिलासा मिळाला आहे.

याआधी नाशिक विमानतळावरून पुणे, अहमदाबाद, हैद्राबाद, कांडला या शहरांना विमानसेवा सुरु होती. परंतु २३ मार्चपासून करोना विषाणूच्या उद्रेकानंतर सर्वात हवाई सेवा बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, महाराष्ट्रात चौथे लॉकडाऊन सुरु असून, याकाळात काही सेवांना शिथिलता देण्यात आली आहे.

करोनाचे सावट सुरु असले तर अर्थकारण मात्र सूरू ठेवावे लागणार असल्यामुळे या सेवांना हळूहळू परवानगी दिली जात आहे. नाशिक हैद्राबाद विमानसेवा अलायन्स एअरकडून दिली जात होती. या कंपनीने पुन्हा एकदा सिव्हील एव्हीएशन विभागाला विमान सेवा पूर्ववत सुरु करण्याच्या परवानगीसाठी पत्र पाठविले आहे. मात्र, अद्याप यावर कुठलाही निर्णय झालेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या