Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दिल्लीपाठोपाठ अहमदाबाद, हैद्राबाद विमानसेवेला नाशिककरांचा भरभरून प्रतिसाद; आतापर्यत ६५ हजार प्रवाशांनी केला प्रवास

Share

नाशिक | रविंद्र केडिया

नाशिकच्या विमान सेवेला प्रवाशांचे पाठबळ मिळत असून दिल्लीला दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर आता अहमदाबाद आणि हैद्राबाद विमानसेवेळा जवळपास ९० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. यासोबतच २०६ मेट्रिक टनापेक्षा अधिक मालवाहतूकदेखील झाल्यामुळे व्यावसायिकामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जुलै 18 ते जुन 19 दरम्यान 65 हजार 388 प्रवाशांंनी या सेवेचा लाभ घेतला तर 206 मेट्रीक टन कार्गो वाहतूक झाली आहे.  नाशिक शहराला विमानसेवेशी जोडण्यासाठी सातत्याने उद्योजक संघटनांंनी प्रयत्न चालवले होते.

माजी पर्यटन मंत्री छगन भूजबळ यांनी नाशिकला विमानतळ उभारुन त्याची मुहूर्तमेढ रोवली होती. खा.हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून हे विमानतळ ‘एव्हिएशन मॅप’वर आले.

त्यात विमानसेवा सुरू करण्यासाठी उद्योजक संघटनांद्वारे पाठंपुरावा करण्यात आला. उद्योजकांनी सर्व उद्योग क्षेत्रातून सर्व्हेक्षण करुन विमान प्रवासासाठीची नाशिकची क्षमता त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

अखेर केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेनेे नाशिककरांच्या स्वप्नाला मुर्त रुप दिले. उडान अंतर्गत सुरू झालेल्या दिल्ली-नाशिक सेवेला सुरूवातीपासूनच जोरदार प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे इतर विमान कंपन्या चौकशीसाठी नाशिककडे येऊ लागल्या.

त्यातून अहमदाबादसाठी दोन वेगवेगळ्या विमान कंपन्यांनी सेवा सुरु केल्या. तर हैद्राबादसाठी एक विमान उडान घेऊ लागले. दरम्यान जेट एअरवेजच्या विमान सेवेत खंड पडल्याने नाशिक- दिल्ली विमानसेवा एप्रिल महिन्यापासून ठप्प झाली.

तरीही नाशिकच्या विमान सेवेवर त्याचा विपरित परिणाम झालेला दिसून आला नाही. प्रवाशांनी दिल्ली गांठण्यासाठी मुंबई सोबतच अहमदाबाद, हैद्राबादलाही पसंती दिल्याचे चित्र आहे.

(Image Source : NashikNews)

कार्गोचीही मोठी उलाढाल

डिसेंबर 2018 मध्ये 26.3 मेट्रीक टन कार्गो मालवाहतूक झाली. तर 3533 प्रवाशांनी विमान सेवेचा लाभ घेतला.त्यात जानेवारीत घसरण झाली असली तरी फेब्रुवारी 2019 पासून पर्यटकांची संख्या मात्र कमालीची वाढली. फेब्रुवारीत 8870 पर्यटक तर 22.7 मेट्रीक टन कार्गो वाहतूक करण्यात आली. तर मार्चमध्ये 9024 प्रवासी व 29.1 मेट्रीक टन कार्गो वाहतूक झाली. याच महिन्यात सर्वाधिक 92 टक्के जागा प्रवाशांंनी भरल्या असल्याची नोंद आहे. प्रवाशंांंची ही संख्या जून अखेरपर्यंत स्थिरच होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!