Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

समाज कल्याण कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलनाचा तिसरा दिवस

Share

नाशिक : मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील महिला गृहपालांची ११६ पदे मे. ब्रिस्क फॅसिलिटीज प्राय लिमिटेड, पुणे या कंपनीच्या मार्फत बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे समाज कल्याण कर्मचाऱ्यांच्या पदेान्नतीवर विपरित परिणाम होणारा आहे व मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टीने हा निर्णय घातक आहे. या लेखणीबंद आंदोलनास विविध सामाजिक संघटनांनी व पालकांनी ही पाठिंबा दिलेला आहे.

सदर निर्णयास विरोध म्हणून समाज कल्याण कर्मचारी संघटना (गट-क), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी 25 सप्टेंबर 2019 पासून पुकारलेल्या लेखणीबंद आंदोलनात तिसऱ्या दिवशीही नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांनी १०० टक्के सहभाग घेतला. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्यभर बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे.

नाशिक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय संकुलातील प्रादेशिक उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद कार्यालय व शासकीय वसतिगृहांतील सर्व कर्मचाऱ्यांनी या लेखणीबंद आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे (गट-क) नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र देवरे व जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे हे लेखणी बंद आंदोलन सुरू आहे. २७ सप्टेंबर २०१९ रोजीच्या दुसऱ्या दिवसाच्या लेखणीबंद आंदोलनात विभागीय सचिव सदानंद नागरे, जिल्हा सचिव महेंद्र होर्शिळ, अजय गांगुर्डे, विष्णू थोरात, मनिषा गांगुर्डे, वैशाली ताके, विजय कोर, गणेश पवार, संतोष सरकटे, जयश्री राठोड, किरण पाटील, राहूल गोंदके, पंढरीनाथ भोये, धिरज बहिरम, संजय पवार, भारती पवार, किरण मोरे, शंतनू सावकार, उमेश पवार, मंगेश शेलार, यांच्यासह सामाजिक न्याय भवनातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. निवडणूकविषयक कामकाज वगळता मागण्या मान्य होईपर्यंत इतर सर्व कार्यालयीन दैंनदिन कामकाजाबाबत लेखणीबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा कर्मचारी संघटनेने घेतलेला आहे.

.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!