Video : राम कदमांच्या प्रतिमेला नाशिकरांनी हांणले प्रतिकात्मक जोडे

0

नाशिक, ता. ५ : दहीहंडीच्या कार्यक्रमात महिला आणि मुलींसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याने भाजपाचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांच्या विरोधात राज्यातील महिलांमध्ये संतापाचा आगडोंब उसळला आहे.

त्यांच्या वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. आज नाशिकमध्येही विविध ठिकाणी प्रतिकात्मक जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या प्रतिमेला प्रतिकात्मक काळे फासून आणि बांगड्यांचा हार अर्पण केला. तसेच त्यानंतर प्रतिमेला प्रतिकात्मक जोडेही मारले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्यासह विविध महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी उपस्थित होत्या.

नवीन नाशिकमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आ.राम कदम यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.

छावाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष आशिष हिरे व शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि.०५ रोजी सावतानगर येथे हे आंदोलन झाले.

यावेळी आ. कदम यांनी चुकीच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी व आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी  मागणीही करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आशिष हिरे,शहरअध्यक्ष योगेश गांगुर्डे, युवा शहर अध्यक्ष योगेश अहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सोनवणे, अर्जुन शिरसाठ, योगेश पाटील, सागर पवार, सागर जाधव, कल्पेश उदावंत, अक्षय राजपूत, जितू हिरे, सुनिल सदगीर, महेश फणसे, उमेश जाधव, चंदू महाले, गणेश बाविस्कर, संदिप चोथवे, विकी सोनगिरे आदि सह छावा पदधिकारी उपस्थित होते.

दरम्यान समाजमाध्यमांमध्येही आ. राम कदम यांच्यावर टिकेची झोड उडविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*