Friday, May 3, 2024
HomeUncategorizedVideo : तब्बल दीड वर्षांनी उघडले वकिलांचे बार रुम्स

Video : तब्बल दीड वर्षांनी उघडले वकिलांचे बार रुम्स

नाशिक | प्रतिनिधी

काेराेनाचा वाढता प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने निर्बंध लावले होते. तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेले जिल्हा व तालुका न्यायालयाच्या आवारातील वकिलांचे प्रवेशद्वार आज खुले झाले. यासाठी नाशिक वकील संघाला उच्च न्यायालयात पाठपुरावा करावा लागला. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बार रुम्स सुरु राहणार आहे….

- Advertisement -

काेराेनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मार्च २०२० पासून न्यायालयीन कामकाज जवळपास बंदच आहे. न्यायालयीन आवारात वकील वर्गांसह पक्षकारांना प्रवेश बंद करण्यात आल्याने व न्यायलयीन कामकाज जवळपास कमी झाल्याने वकील वर्गाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर सर्शत बार रुम्स उघडण्याची परवानगी मिळाली आहे. आता प्रत्येत बार रुम्समध्ये वकीलांना ५० टक्के बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या बार रुम्समध्ये वकीलांना दोन मास्कचा वापर करावा लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या