Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दुसरी यादी प्रसिद्ध : विज्ञानसाठी 89, वाणिज्यसाठी 84 टक्के कटऑफ

Share

नाशिक । प्रतिनिधी
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी प्रसिद्ध झाली. दुसर्‍या यादीत 6 हजार 642 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. पहिल्या कटऑफच्या तलुनेत दुसरा कटऑफ तीन ते चार टक्क्यांनी खाली घसरला आहे.

विज्ञान शाखेसाठी 89 टक्के तर वाणिज्य शाखेसाठी 84 टक्के कटऑफ आहे. यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना 25 जुलैपर्यंत प्रवेशाची संधी आहे.

दुसर्‍या यादीत आरवायके महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा खुल्या प्रवर्गातील कटऑफ सर्वाधिक 89.40 टक्के असून बीवायके महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा कटऑफ 84.40 टक्के आहे. दुसर्‍या यादीत विज्ञान शाखेच्या 3 हजार 35, वाणिज्यच्या 2 हजार 720, कला शाखेच्या 817 तर एमसीव्हीसीच्या 70 विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.

25 जुलै रोजी तिसर्‍या यादीसाठीच्या उपलब्ध जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर अर्जाच्या भाग 1 व 2 मध्ये बदल करण्यासाठी 27 ते 29 जुलैदरम्यान मुदत देण्यात येईल. 1 ऑगस्टला तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यापूर्वी 12 जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होऊन 14 हजार 845 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती.

त्यापैकी केवळ 8 हजार 171 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे उर्वरित 17 हजार जागांसाठी विद्यार्थी व पालकांना दुसर्‍या यादीची प्रतीक्षा होती.

प्रमुख महाविद्यालयांचे कटऑफ
भोसला मिलिटरी (विज्ञान) 81.80
बीवायके            (वाणिज्य) 84.40
बिटको ना.रोड  (वाणिज्य) 75.80
बिटको ना. रोड (विज्ञान) 79.80
एचपीटी           (कला ) 60.80
एचपीटी          (विज्ञान) 89.40
केटीएचएम    (वाणिज्य) 80.60
केटीएचएम    (विज्ञान) 85.20
केव्हीएन नाईक  (विज्ञान) 85.80
पंचवटी महाविद्यालय (विज्ञान ) 77.40

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!