Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कोरोना’चा सामन्यासाठी ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’; नागरिकांनी संपर्क साधावा

Share

नाशिक ।  प्रतिनिधी

करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु असून या संकटाशी सामना करण्यासाठी जल्ह्यात’इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ कार्यन्वित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

कोविड 19 टीमच्या अधिकार्‍यांशी जिल्हाधिकार्‍यांनी चर्चा करुन आढावा घेतला. एकीकडे आरोग्य विभागाचे सबळीकरण करत असतांनाच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकुल परिणाम फारसा होऊ नये यासाठी हे ’इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ कार्यान्वित करत आहोत. या सेंटर मध्ये जिल्ह्यातील 20 अधिकार्‍यांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत.

त्यातील प्रत्येकाला एक जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. जे उद्योगधंदे कलम 144 मधुन वगळले गेले आहेत, जे जीवनावश्यक आहेत ते सुरळीत चालु राहतील.

जसे भाजीपाला, किराणा, औषधे वेळवर मिळण्यासाठी तसेच दैनंदिन वित्तीय व्यवहार कमीत कमी बाधीत होतील यासाठी यातील प्रत्येक अधिकारी आपआपली जबाबदारी पार पाडेल. जिल्हयातल्या सकंटसमयी प्रशासनास मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावत आहेत

अशा प्रकारच्या सामाजिक संस्थांचे समन्वयन व नियंत्रणासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील नागरीकांना आम्ही अधिकार्‍यांची नावे व मोबाईल नंबर्स उपलब्ध करून देत आहोत. नागरीकांनी आपल्या कामाच्या संदर्भात थेट त्या अधिकार्‍यांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

इमर्जन्सी ॲक्शन सेंटरचे ‘संकट सोबती’…
(अ.नं. अधिकारी व पदनाम संपर्क क्रमांक जबाबदारी)

1 निलेश सागर अपर जिल्हाधिकारी , नाशिक 9422227990 विविध विभागांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय क्षेत्रीय यंत्रणा, व्हॉटसॲप/ लघुसंदेश, ईमेल इ.द्वारे पाठविणेची सोय करणे.
शासनाच्या विभागांकडून निर्गमित केलेल्या धोरणात्मक निर्णया संदर्भात क्षेत्रीय स्तरावर संबधित विभागामार्फत अंमलबजावणी करणे
शासनाने घेतलेल्या निर्णया संदर्भात जिल्ह्यात होत असलेल्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेणे व EOC मध्ये सर्व माहिती दररोज सायंकाळी 5 वाजेपर्यंत अद्ययावत ठेवणे
निम्न अधिकाऱ्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव, शंका इ.बाबत मार्गदर्शन पर कार्यवाही करणे, समन्वय राखणे.

2 कुमार आशिर्वाद,सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक 9871017596 उपचाराकरिता आवश्यक असलेली विविध साधन व साहित्य यांचे तांत्रिक विनिदेष निश्चित करणे व खरेदीची सर्व उपाययोजना करणे.
डॉ.अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय, नाशिक 9881733345 वैद्य.महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देणे व त्यांचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोग करुन घेणे.
सेवानिवृत्त तज्ञ व अन्य तांत्रिक वैद्यकीय सेवा संलग्न अधिकारी/ कर्मचारी यांची जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी नियोजन करणे.

3 श्री.भागवत डोईफोडे, निवासी उप जिल्हाधिकारी, नाशिक 9423785785 कार्यालयाचे नियमित प्रशासकीय कामकाज बाधित होऊ न देणे व तातडीचे संदर्भ निकाली काढणे

4 अरविंद नर्सीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक 9403689487 आपत्कालीन परिस्थितीमध्ये अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तुंचा नियमित स्वरुपात पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी.

5 अरविंद अंतुर्लिकर, उपजिल्हाधिाकरी प्रशासन नाशिक 9545573109 विविध स्वयंसेवी संस्था व नागरिकांकडून देऊ केलेल्या मदतीबाबत योग्य नियोजन करणे व त्यांचे वितरण योग्य व्यक्तींना व योग्यप्रकारे होईल याची दक्षता घेणे.

6 प्रकाश थविल, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी मनपा नाशिक 9420735855 नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये संभाव्य बाधित रुग्णांसाठी पुरेशी अलगीकरण व्यवस्था यासंदर्भात शासनादेशात नमूद सर्व बाबींच्या पुर्ततेसह करावी.

7 नितीन कापडणीस उपायुक्त, मालेगांव महानगरपालिका मालेगांव 9923014353 मालेगांव महानगरपालिका क्षेत्रामध्ये संभाव्य बाधित रुग्णांसाठी पुरेशी अलगीकरण व्यवस्था यासंदर्भात शासनादेशात नमूद सर्व बाबींच्या पुर्ततसह करावी.

8 देविदास टेकाळे जिल्हा प्रशासन अधिकारी (न.पा.क्षेत्र) 9594552157 सर्व नगरपालिका क्षेत्रामध्ये संभाव्य बाधित रुग्णांसाठी पुरेशी अलगीकरण व्यवस्था या संदर्भात शासनादेशात नमूद सर्व बाबींच्या पुर्ततेसह करावी.

9 श्रीमती वैशाली झनकर-वीर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नाशिक 9595333222 सर्व ग्रामीण क्षेत्रामध्ये संभाव्य बाधित संभाव्य बाधित रुग्णांसाठी पुरेशी अलगीकरण व्यवस्था या संदर्भात शासनादेशात नमूद सर्व बाबींच्या पुर्ततेसह करावी.

10 नितीन गवळी
प्रादेशिक अधिकारी म.औ.वि.महामंडळ नाशिक 9422410557 अनुज्ञेय उद्योगधंदे सोशल डिस्टसिंगचे नियम पाळूनच सुरु राहतील याची दक्षता घेणे तसेच त्यांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे.

11 सतिष भामरे व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, नाशिक 9423447112 प्रभावित झालेल्या उद्योग व्यवसाया समवेत विचार विनियम करुन उपाययोजना करणे व कलम 144 ची प्रभावी अंमलबजावणी करणे.

12 श्रीमती ज्योती कावरे
उपजिल्हाधिकारी, नाशिक 9850089155 आपत्कालिन परिस्थितीमध्ये शासनाने उपाययोजनांची माहिती लोकप्रतिनिधींना देणे. शासनाकडून करावयाच्या विविध उपाययोजना संदर्भात लोकप्रतिनिधी यांचेकडून प्राप्त होणाऱ्या सुचनांचे संकलन करणे.

13 संजीव पडवळ
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक 9422211941 कृषी व पुरक उद्योगधंदे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळुनच सुरु राहतील याची दक्षता घेणे तसेच त्यांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे.

14 दुष्यांत भामरे, सहआयुक्त औषधे प्रशासन, नाशिक 9820245816 औषध निर्मिती व पुरवठा यामध्ये कोणतीही समस्या उदभवणार नाही, साठेबाजी अथवा काळाबाजार होणार नाही तसेच या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जातील याची दक्षता घेणे.

15 चंद्रशेखर साळुंखे सहा.आयुक्त अन्न व प्रशासन नाशिक 9921226448 अन्न निर्मिती व पुरवठा यामध्ये कोणतीही समस्या उदभवणार नाही, साठेबाजी अथवा काळाबाजार होणार नाही तसेच या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जातील याची दक्षता घेणे.

16 निलेश श्रींगी उपजिल्हाधिकारी
भूसंपादन राहर नाशिक 9552529697 चेकपोस्ट मॅनेजमेंट व CRPC 144 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.

17 गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक 9822458130 वित्त सेवा सुरळीत सुरु राहतील तसेच प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जातील याची दक्षता घ्यावी.अरविंद चतुर्वेद
जिल्हा अग्रणी बँक अधिकारी , नाशिक 9422284764

18 राजेश साळवे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नाशिक 9422770785 माहिती व अहवाल संकलीत करणेसाठी सुकर संगणकीय कार्यपद्धती वरील सर्व अधिकाऱ्यांना उपलब्ध करुन ठेवणे तसेच वेळोवेळी अद्ययावत करणे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!